सामाजिक

विषाक्त अन्न देऊन मोरांची शिकार , सहा मोरांचा मृत्यू

Spread the love

वर्धा / प्रतिनिधी

              जिल्ह्यातील आर्वी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या लहादेवी शिवारात गस्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांना5 मोर मृतावस्थेत आढळून आले होते. आणि एक मोर मरणासन्न स्थितीत होता.अधिकाऱ्यांनी या जखमी मोराला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले असता त्याचा मृत्यू झाला.ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज आर्वी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र आर्वी नियतक्षेत्र लहादेवी कक्ष 87 संरक्षीत वनात मौजा लहादेवी जवळ नाल्याजवळ वनरक्षकांना गस्ती दरम्यान 5 मोर मृतावस्थेत तर एक मोर जिवंत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. जाधव वनकर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जीवंत मोराला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. घटनास्थळावर मोरांना मका व तुर सोबत किटकनाशकाचा मिश्रण करुन पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवले असल्याचे दिसुन आले. मृत 6 मोरांचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन करुन सारंगपुरी परिसरात दहन करण्यात आले. शवविच्छेदना दरम्यान प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी मोराचे अवयवाचे नमुने घेण्यात आले आहे.

शिकार प्रकरणात सुरपाल जिवानसिंग बामने याच्या विरुद्ध वनगुन्हा नोंदवत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहाय्यक वनसंरक्षक जी. पी. बोबडे यांच्या मार्गदर्शनात व वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वात परिवीक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे, आर्वी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी पुढील तपास करत आहे.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close