सामाजिक

बाबासाहेब कवाद पतसंस्थेच्या वतीने अमोल शिंदे , सचिन ढवण, अक्षय भांबरे यांचा सन्मान .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निघोज येथील अमोल कैलास शिंदे , सचिन नाथा ढवण यांची महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत एम.पी.एस.सी परिक्षेत यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा पुणे विभागात कालवा निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व अक्षय पांडुरंग भांबरे यांची इंडियन आर्मी मध्ये फार्मसिस्ट पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद व संचालक मंडळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद म्हणाले की, या सर्वांनी स्पर्धा परीक्षा मध्ये कठोर परिश्रम घेऊन हे यश संपादन केलेले असून पुढील काळात आपल्या निघोज परिसरातील मुला मुलींना युपीएससी व एमपीएससी परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी आपल्या नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांनी निघोज मध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र मंजूर करुन भव्य इमारती चे बांधकाम ही पुर्ण झालेले असून आपण श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून अभ्यासिके साठी लागणाऱ्या सेवा , सुविधा पुरविण्याचे कामकाज करत आहोत . अभ्यासिके मध्ये आपल्या तालुक्यातील , परिसरातील उच्चशिक्षित अधिकारी यांचे ही आपण मागदर्शन घेणार आहोत . निघोज परिसरातील मुला मुलींना पुढील काळात होणारे वेगवेगळे बदल परीक्षांचे स्वरूप कसे असेल, या संदर्भात मार्गदर्शन करावे .
आपण नोकरी करीत असताना प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे काम प्रामुख्याने करावे , अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली .व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके , पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नामदेव मामा थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे, , भिवाशेठ रसाळ ,बाबाजी कळसकर , निघोज परिसर कृषी फलोदयान संस्थेचे उपाध्यक्ष अमृता रसाळ , मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, संपत ठुबे ,उप व्यवस्थापक शांताराम सुरकुंडे , रायचंद गुंड , भाऊ रसाळ , कैलास शिंदे गुरुजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय लंके यांनी केले आभार शांताराम कळसकर यांनी मानले .

सहकार क्षेत्रातील जाणकार दिवंगत बाबासाहेब कवाद यांनी स्थापन केलेल्या व त्यांच्याच नावाने नावारूपाला आलेल्या बाबासाहेब कवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अद्यापर्यंत सामाजिक , शैक्षणिक , कृषी , पत्रकारिता , धार्मिक , क्रिडा या व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला . त्यामुळे या गुणवंतांच्या कार्याला चालना मिळून इतरांनी त्यांचा आदर्श घेतल्याने सर्वत्र संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे . ]

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close