विदेश

भर बाजारात गोळीबार ; 47 लोकांचा मृत्यू

Spread the love

मेंढपाळ आणि शेतकऱ्यांत सुरू असपेल्या संघर्षाचा परिणाम असल्याचा अंदाज

मेंढपाळांनी गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय

बेन्यू (नायजेरिया) / नवप्रहार डेस्क

                    नायजेरियाच्या  उत्तर पश्चिमेकडे येत असलेल्या बेन्यू  येथील बाजारात काही बंदुकधाऱ्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा मेंढपाळ आणि शेतकऱ्यांत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसल्याने हा हल्ला मेंढपाळांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. भर बाजरात झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. एक दिवसापूर्वी अश्याच घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृतांचा आकडा 50 झाला आहे.

उत्तर मध्य नायजेरियामध्ये जमिनीचे वाद सुरू आहेत. या वादातून मेंढपाळ आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा हाणामाऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा हल्ला या मेंढपाळांनी घडवून आणला असावा असा पोलिसांचा कयास आहे. ओटुक्पो अध्यक्ष रुबेन बाको यांनी या हत्येची पुष्टी केली आहे. बेन्यूच्या उमोगिदी गावात बंदूकधाऱ्यांनी 47 लोकांना ठार मारलं. त्याआधी याच ठिकाणी तीन लोकांची हत्या करण्यात आली होती, असं ओटुक्पो यांनी सांगितलं. बंदूकधारी तोंडाला मास्क लावून आले होते. त्यांनी बाजारात आल्या आल्या काहीही न बोलता थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रत्येकजण जीवाच्या आकांताने पळत होता. पळत असताना चेंगराचेंगरीचीही घटना घडल्या. अनेकांना धावपळीत किरकोळ मारही लागला, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

हल्ल्याची जबाबदारी नाही

दरम्यान, या हल्ल्याची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. त्यामुळे या हल्ल्याचा संशय स्थानिक मेंढपाळांवर व्यक्त केला जात आहे. नायजेरियाच्या उत्तर पश्चिम आणि मध्य क्षेत्रात शेतकरी आणि मेंढपाळांमध्ये काही दशकांपासून संघर्ष सुरू आहे. जमिनीचा हा वाद आहे. त्यामुळे यंदा शेतीतून उत्पन्नही कमी आलं आहे. या क्षेत्रात गरीबी प्रचंड आहे. भूकबळीही जात आहेत. या जमिनीवरील पिकं जनावरांसाठी आहे. हा चारा जनावरांना मिळाला पाहिजे, असं मेंढपाळांचं म्हणणं आहे. तर आमच्या शेतीत तुमचं काम काय? असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

तीन पोलिसांची हत्या

दरम्यान, रशियाच्या इंगुशेतिया येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात तीन पोलिसांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. ग्रामीण भागात सशस्त्र टोळी लपल्याची पोलिसांना खबर मिळाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close