सामाजिक

भद्रावतीच्या सेवेत ऑक्सिजन सपोर्टसह सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका दाखल

Spread the love

केंद्रीय मंत्री मा .नितीनजी गडकरी यांच्या सौजन्याने भद्रावतीच्या सेवा फाउंडेशनला सुसज्ज असलेली रुग्णवाहिका भेट.

अविरतपने आरोग्यदायी रुग्णांना सेवा देणाऱ्या सेवा फाउंडेशनच्या पदाधिकार्‍याचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी केले अभिनंदन.

(चंद्रपूर -भद्रावती) नागपूर सह विदर्भ स्तरावर भद्रावती येथील ‘सेवा फाउंडेशन ‘नागरिकांच्या आरोग्यदायी (ब्लड डोनेट) सह सेवा देण्याच्या अनेक उपक्रमासह अनेक बाबीवर गेली अनेक वर्षापासून युथ ग्रुप कार्यरत असून. त्यांच्या या कार्याची दखल घेत मा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी भद्रावती येथील सेवा फाउंडेशन ला ऑक्सीजन सपोर्टसह सुसज्ज असलेली रुग्णवाहिका नुकतीच भेट दिली. सदर रुग्णवाहिका भद्रावतीच्या सेवेकरता दाखल झाली असून, सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून युथ ग्रुप प्रमुख पदाधिकारी राज खंडारे, सोनू बोनागिरी, पंकज चालखुरे या रुग्णवाहिका माध्यमातून भविष्यात तत्परतेने रुग्णांच्या सेवेसाठी सज्जपणे कामकाज पाहणाऱ्या युवा पदाधिकाऱ्यांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, जनमंच सदस्य नागपूर रवींद्र तिराणिक यांनी सेवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यासहित कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या अविरत सेवेकरता अभिनंदन व्यक्त केले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close