सामाजिक
अंबिकादेवी विद्यालय सौन्दळाच्या कु. गायत्री दुतोंडेचा प्रामाणिकपणा.
हिवरखेड / प्रतिनिधी
सौन्दळा येथील श्री अंबिकादेवी विद्यालय सौन्दळाच्या वर्ग 9 मध्ये शिकणाऱ्या वारखेड येथील कु. गायत्री श्रीकृष्ण दुतोंडे हिने मैदानावर सापडलेले 1650 रु. शिक्षकांकडे जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला. मधल्या सुटीत मैदानावर फिरत असतांना तिला एका ठिकाणी 1650 रु. दिसले. तिने ते उचलून प्रामाणिकपणे शिक्षक शैलेश तराळे सरांकडे जमा केले. ते पैसे शाळेतीलच कर्मचारी ज्ञानेश्वर मेतकर यांचे असल्याचे नंतर लक्षात आले. ते त्यांना परत करण्यात आले. कु. गायत्रीच्या या प्रामाणिकपणाबद्दल विद्यालयाच्या वतीने तिला सन्मानचिन्ह व रजिस्टर देऊन तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या या प्रामाणिकपणाचे शिक्षकांनी कौतुक केले व तिचा हा गुण सर्व विद्यार्थ्यांनी अंगीकारावा असे आवाहन केले आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1