सामाजिक

३१ वर्षांनी माजी विद्यार्थी जमले स्नेहमेळाव्यातील रमले जुन्या आठवणीत ,

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – मोराची चिंचोली येथे निसर्ग रम्य वातावरणात पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील जनसेवा विद्यालयामधील सन १९९३ तील इयत्ता दहावी च्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल ३१ वर्षांनी आनंदात संपन्न झाला.
तब्बल ३१ वर्षानंतर शाळा भरल्याने माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी ६८ माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते.स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी
प्राध्यापक डॉ.शांताराम चौधरी,
ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सपकाळ,प्राध्यापक सचिन आहेर,अंकुश सरडे,मनिषा मोरे,सुभाष सुरुडे,पोपटराव चौधरी,पांडुरंग तोडकर,श्रीकांत मोरे,संभाजी खोसे आणि सर्वच माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या स्नेह मेळाव्यासाठी पुढाकार घेतला.सुरुवातीला माजी विद्यार्थ्यांची ओळख परेड झाली.इतक्या वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांनाच आनंद झाला होता.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
बोलताना शिक्षक संभाजी खोसे म्हणाले , आपण सर्वजण खूप बिकट परिस्थिती शिकून मोठे झालो आहे , पण आपल्या सर्वांना गरिबीची जान आहे.समजाप्रती आदर आहे.
यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्याने वातावरण भारावून गेले . अनेकांना अश्रू ही अनावर झाले, एकमेकांच्या आस्थेने विचारपूस केली . तदनंतर सुग्रास मिष्ठान्नाचे जेवण झाले . पुढील वर्षी असेच पुन्हा एकदा भेटण्याच्या आणाभाका घेतल्या व सर्वांनी निरोप घेतला .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close