राज्य/देश
आधीच पावसाचा कहर त्यात न प च्या फुटलेल्या पाईप लाईन ची भर
अरविंद वानखडे
यवतमाळ / प्रतिनिधी
राज्यात बरसणाऱ्या कोसळधार पावसामुळे नदी नाले तुटुंब भरुन वाहत आहे.त्यामुळे सगळीकडे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात नदी नाल्यांना पूर आला आहे.अनेक गावांना पाण्याने वेढले आहे. महागाव , आर्णी, बाभूळगाव तालुक्यात परिस्थिती भयंकर आहे. या तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली असून लोक पाण्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाचे रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहेत.
राज्यात पावसाने हाहाकार मचवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील गावे पाण्याखाली आहेत. घरात पावसाचे पाणी आहे. तर शेतात पावसाचे पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली आली आहेत. काही शेतातील पिके तर पुराच्या पाण्याने खरडून गेली आहेत.
महागाव येथे हेलिकॉप्टर ने रेस्क्यू ऑपरेशन, 80 हुन अधिक लोक अडकल्याची माहिती – जिल्ह्यातील महागाव तालुक्यात पूर स्थिती भयंकर आहे. तालुक्यातील आनंद नगर या भागात एनडीआरएफ ची चमू रेस्क्यू ऑपरेशन करीत आहे. या भागात 80 हुन अधिक लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या रेस्क्यू साठी हेलिकॉप्टर ची मदत घेण्यात येत आहे. हेलिकॉप्टर लँडिंग साठी हायवे चा उपयोग करण्यात आला आहे.
आर्णीत अर्धे शहर पाण्याखाली –
जिल्ह्यातील आर्णी येथील वैनगंगा नदीला पूर आल्याने अर्ध अधिक शहर पाण्याखाली आहे या ठिकाणी सुद्धा प्रशासनाचे मदत कार्य सुरू आहे.
बाभूळगाव तालुक्यात सुद्धा तीच स्थिती –
बाभुळगाव तालुक्यात सुद्धा वाघाडी नदीला पूर आल्याने अनेक शेती मध्ये पाणी घुसले असून रस्त्यावर वाहतूक खोलंबली आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने आणि पाणी पुलावरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसाचा कहर त्यात न प च्या पाईप लाईन ची भर – एकीकडे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या यवतमाळ शहरातील अनेक भागात पाणी साचले होते.सकल भागात तर स्थिती बिकट होती. मुख्य म्हणजे शहराच्या मुख्य मार्गावर मांडी मांडी पाणी होते.त्यामुके काही तास बससेवा बंद ठेवल्यात आली होती. अश्यातच न प च्या चेंबर ची पाईप।लाईन फुटल्याने पाटी पूऱ्यातील अनेक घरात पाणी शिरले होते.