Uncategorized

अल्पवयीन हिंदू मुलीचे अपहरण करून धर्मांध तरुणांकडून सतत सामूहिक बलात्कार 

Spread the love

हातावरील ॐ एसिड ने पुसले, जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले 

बंद खोलीत चार तरुणांनी केला सतत  दोन महिने बलात्कार

मुरादाबाद  / प्रतिनिधी

 

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. धर्मांध तरुणांनी एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला खोलीत बंद करून तिच्यावर चार तरुणांनी सतत दोन महिने बलात्कार केला आहे. इतकेच काय तर तिच्या हातावर असलेले ॐ चे टेटू ॲसिड ने पुसण्यात आले.तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातले.  या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी एका आरोपीला अटक केली आहे, सलमान असं त्याचं नाव तर इतर तीन जण फरार आहेत.पीडित तरी शींपीकडे जात असताना तिचे अपहरण करण्यात आले होते.=

मुलीच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार 2 जानेवारी 2025 रोजी मुलगी शिंपीकडे जात असताना तिचे अपहरण करण्यात आलं.आरोपीने तिला गाडीत बेशुद्ध केलं. यानंतर, तिला भोजपूर परिसरातील एका घराच्या खोलीत बंदिस्त करून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला. 2 मार्च रोजी आरोपी सलमान पीडित मुलीला तिच्या गावात सोडून पळून गेला. पीडितेच्या कुटुंबाने तोंड उघडल्यास त्यांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की आरोपी त्यांना केस मागे घेण्यासाठी धमकावत आहेत.

घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि गोंधळ घातला आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. माहिती देताना पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कुंवर आकाश सिंह म्हणाले की, भगतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एक सलमान याला मंगळवारी अटक करण्यात आली आणि नंतर तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.  इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल.

भगतपूर पोलीस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) संजय कुमार पांचाळ म्हणाले की, मुलीला कैदेत ठेवताना आरोपींनी तिच्या हातावरील ‘ओम’ टॅटू अॅसिडने जाळला, तिला जबरदस्तीने मांस खायला दिलं आणि इतर छळ केले. तक्रारीच्या आधारे, सलमान, जुबैर, रशीद आणि आरिफ या चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close