अल्पवयीन दिराने बनवला वहिनीचा तसला व्हिडीओ

सासरच्या मंडळीने काहीच न केल्याने महिलेची पोलिसात धाव
सासू म्हणाली व्हिडीओच बनवला न बलात्कार तर नाही केला
अहमदाबाद (गुजरात ) / नवप्रहार मीडिया
14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या नवविवाहित वहिनीचा अश्लील व्हीदौ बनविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब महिलेने सासरच्या मंडळीला सांगितल्यावर त्यानी त्या मुलाला सॉफ्ट कॉर्नर दिल्याने आणि सासूने त्याने फक्त व्हिडीओच बनवला न बलात्कार तर नाही केला असा शब्द प्रयोग केल्याने दुखावलेल्या नावविहाहितेने पोलिसात धाव घेत दिरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी ही एका अमेरिकन कंपनीत काम करते. या प्रकरणातील महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा तिने या प्रकरणाची माहिती तिच्या पती आणि सासऱ्याच्या लोकांना सांगितली. तेव्हा त्या अल्पवयीन दिराचा बचाव करण्यात आला. त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती नवविहित महिलेने केली तेव्हा त्या प्रकरणावरून तिला मारहाणही करण्यात आली व तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले.
बाथरूममध्ये मोबाईल लावला
या प्रकरणाची माहिती सांगताना महिलेने सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता ती आंघोळीसाठी गेली होती. मात्र त्याआधी तिच्या दिराने तिला मी बाथरूममध्ये जाणार असल्याचे सांगत तो आता जाऊन आला होता. त्यानंतर ती आता गेल्यानंतर बाथरुममध्ये व्हिडीओ चालू करून ठेवलेला तिला मोबाईला दिसला. त्यावेळी तिला वाटले हा मोबाईल तो चुकून विसरून गेला आहे मात्र नंतर तिच्या लक्षात आले की, मोबाईलाचा कॅमेरा चालू असून व्हिडीओ सुरुच आहे. त्यावेळी तिच्या लक्षात आले की, त्यामध्ये आपला न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे.
पुन्हा असं करू नको
ही घटना तिने आपल्या पतीला सांगितली तेव्ही तिच्या नवऱ्याने त्याच्या भावाला एक थप्पड मारली, आणि सोडून दिले. त्यावेळी त्याला हेही सांगण्यात आले की, तू असं पुन्हा काय करू नकोस. त्यावेळी सासरच्या लोकांनी त्याचा बचाव करण्यासाठी वयात आलेली मुलं असे व्हिडीओ पाहत असतात असं सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
फक्त व्हिडिओ बनवला…
या घटनेतील पीडितेने सांगितले की, या घटनेनंतर विवाहिता प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने सासरचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. राहण्यासाठी नवं घर शोधत असताना तिचे आणि सासूचे भांडण झाले. त्यावेळी सासू तिला म्हणाली की, तुझा फक्त व्हिडीओच बनवला आहे, तुझ्यावर बलात्कार तर केला नाही असा धक्कादायक सवाल केला होता. त्यामुळे या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.