क्राइम

त्या शाळेत लहान मुलींचे पॉर्न व्हिडीओ आणि मानवी तस्करी होत असल्याचा आरोप 

Spread the love

बदलापूर / नवप्रहार डेस्क

                      येथील एका नामांकित शाळेत लहान चिमूरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्या नंतर अक्षय शिंदे नामक कर्मचाऱ्याला  अटक कारण्यात आली होती. काल त्याचा पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये मृत्यू झाला आहे. त्यामळेभे प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे. याचवेळी माहिती अधिकार कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी अॅड.राजाभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टात  फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळेब्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

  बदलापूरच्या त्या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि लहान मुलींचे पोर्न व्हिडीओ बनवत होते, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अक्षय शिंदे  याबाबत गौप्यस्फोट करणार होता, त्याआधीच त्याचा गेम करण्यात आल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. याचिकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शाळेच्या ट्रस्टीची पोलखोल करणार होता अक्षय शिंदे

बदलापूरच्या त्या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट देशभरात चालवतात. याबाबत अक्षय शिंदे मोठा गोप्यस्फोट करणार होता. मात्र, त्याआधीच त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयला ठार मारून या रॅकेटच्या म्होरक्यांना वाचवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हायकोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष समितीच्या प्रमुख आणि माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासमोर अक्षय शिंदे हा शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करणार होता. मात्र, त्याआधीच त्याला संपवण्यात आलं, असा खळबळजनक दावा हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आला आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर आणि संबंधित शाळेचे ट्रस्टीची सीबीआय चौकशीची मागणी केतन तिरोडकर यांनी केली आहे.

केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत ठाणे पोलिस आयुक्तांसह शिंदे सरकार व सीबीआयला प्रतिवादी बनवण्यात आलं आहे. तसेच बदलापूरच्या शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी व चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेटमधील सहभाग आहे. या रॅकेटच्या म्होरक्यांचे सत्ताधारी सरकारशी कनेक्शन असून त्या नराधमांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर केला, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

अक्षय शिंदेसारखे तरुण रॅकेटचे ‘फ्रंट मॅन’

शाळेचे ट्रस्टी अद्याप फरार आहेत. ट्रस्टींचे सत्ताधारी सरकारमधील नेत्यांशी राजकीय संबंध आहेत. फरार ट्रस्टी मानवी तस्करी व चाईल्ड पोर्नोग्राफीच्या रॅकेटचा म्होरक्या आहे, तर अक्षय शिंदेसारखे तरुण रॅकेटचे ‘फ्रंट मॅन’ आहेत. बदलापुरातून आणखी दोन मुली बेपत्ता झाल्या असून त्यातील एक मुलगी याच शाळेतील आहे. अक्षय शिंदे याने या संपूर्ण कटाचा उलगडा केला असता तर ट्रस्टी मोठ्या अडचणीत सापडले असते, याच भीतीने अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करण्यात आल्याचा दावा केतन तिरोडकर यांनी केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याचिकेतील मागण्या कोणत्या?

  • अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सीबीआय चौकशी करावी.
  • अक्षय शिंदेविरोधात बदलापूर पोलिस ठाण्यात 16 ऑगस्टला दाखल केलेला एफआयआर तसेच 17 आणि 13 ऑगस्टला दाखल केलेल्या एफआयआरचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा.
  • तळोजा कारागृहात असलेली अक्षय शिंदेची कागदपत्रे, त्याने लिहिलेली पत्रे तसेच त्याच्याशी संबंधित इतर सर्व साहित्य सीबीआयकडे सोपवावे.
  • हायकोर्टाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाशी समन्वय साधून सीबीआयने संबंधित गुन्ह्यांचा सखोल तपास करावा.
  • अक्षय शिंदेसोबत जे पोलिस अधिकारी होते, त्यात संजय शिंदे यांची सखोल चौकशी करावी.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close