क्राइम

तीन तरुणींवर त्यांनी मित्राच्या माध्यमातून एका मैत्रिणीवर बलात्कार करवून घेतल्याचा आरोप   

Spread the love

पिलीभीत (युपी) / नवप्रहार मीडिया नेटवर्क

               तीन तरुणींनी त्यांच्या एका अल्पवयीन मित्रासोबत त्यांच्या एका मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांकडून करण्यात आल्या नंतर पोलिसांनी तिन्ही तरुणींना ताब्यात घेतले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच सत्यता बाहेर येईल असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे हा प्रकार घडला असून पीडितेच्या वडिलांनी याबाबत तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी पीडिता तिच्या या तिन्ही मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती. त्यावेळी आरोपी मुलाने तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. 6 ऑगस्ट रोजी या प्रकाराचा उलगडा झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.

चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. लैंगिक अत्याचार घटनेत पीडितेच्या मैत्रिणींचा नेमका काय सहभाग आहे, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पीडितेच्या वडिलांनी या तिन्ही मुलींवर आरोप केले असून त्यातील तथ्यता पडताळल्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close