हटके

नवऱ्याचे जबरदस्ती धर्मांतर करून लग्न लावून दिल्याचा बायकोचा आरोप 

Spread the love

नवरा आहे नायब तहसीलदार 

हमीरपूर / नवप्रहार मीडिया 

            आपल्या पतीचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्याचे लग्न लावून दिल्याचा आरोप एका महिकेने केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा नवरा हा नायब तहसीलदार आहे.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर इथल्या एका महिलेने आरोप केला आहे की तिच्या पतीचे जबरदस्ती धर्मांतरण करण्यात आले आहे. इतकंच नाही तर धर्मांतर केल्यानंतर आपल्या पतीचे एका मुस्लिम महिलेशी बळजबरी लग्न लावून दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

कानपूरमधील हनुमान विहारमध्ये राहणाऱ्या आशीष गुप्ताची बायको आरती गुप्ता हिने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आशीष गुप्ता हा नायब तहसीलदार आहे.

आरतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तिचा नवरा आशिष हा गेल्या 4 महिन्यांपासून घरी आलेला नव्हता. आरतीने त्याचा शोध घेतला असता तिला कळाले की आशीषला दमदाटी करून त्याचे धर्मांतर करण्यात आले आहे. यानंतर त्याचा निकाह रुखसान नावाच्या महिलेशी लावून देण्यात आला. पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एक मौदाहातील मशिदीतून 2 मौलवींना ताब्यात घेतले आहे.

सदर प्रकाराबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की दंड संहिता आणि उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आशिष हा मौदाहा शहरातील एका मशिदीत नमाज अदा करणार होता. मशिदीचे मुहम्मद मुश्ताक यांनी सांगितले की, एक अज्ञात व्यक्ती नमाज अदा करण्यासाठी मशिदीत येत होता. या व्यक्तीने त्याचे नाव मुहम्मद युसूफ असल्याचे सांगितले होते. आपण कानपूरचे रहिवासी असल्याचे आणि मौदाहाचा नायब तहसीलदार असल्याचे या व्यक्तीने म्हटले होते. मुश्ताक यांचे म्हणणे किती खरे आहे, किती खोटे आहे हे जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत असून त्यांनी या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close