हटके

लग्नात फोटोग्राफी साठी आलेला तरुण नवऱ्याच्या बहिणीला घेऊन रफुचक्कर

Spread the love

मुजफ्फर नगर (बिहार) / नवप्रहार मीडिया 

                     लग्नात आलेला फोटोग्राफर नवऱ्याच्या बहिणीला इतका आवडला की तिने रात्रभर जागून त्याच्या सोबत फोटोशूट केले आणि दुसऱ्या दिवशी मार्केट जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडली ती कायमचीच. सगळीकडे शोधून देखील ती न सापडल्याने शेवटी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवण्यात आली. फोटोग्राफर मुलीच्या वहिनीच्या गावातील होता. तो मुलीसोबत गावात दिसल्याची चर्चा आहे.

मुलाच्या विवाहात आलेला फोटोग्राफरच त्यांच्या अल्पवयीन मुलीला घेऊन फरार झाला, असा आरोप या नातेवाईंकांनी केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

मुझफ्फरपूरमधील चंदवाराघाट दामोदरपूर गावात ही घटना घडली आहे. ४ मार्च रोजी येथे एका तरुणाचा विवाह होता. इथून दुसऱ्या गावात वरात जाणार होती. लग्नाच्या कार्यक्रमाचं छायाचित्रण करण्यासाठी मुलाच्या भाओजींच्या गावातून एक व्हिडीओग्राफर बोलावण्यात आला होता. त्याने लग्न सोहळ्याचं प्रत्येक बाजूने चित्रिकरण केलं. मात्र याचदरम्यान त्याची नवऱ्याच्या बहिणीसोबत नजरानजर झाली. त्यानंतर लग्नसोहळा संपल्यानंतर हा व्हिडीओग्राफर नवऱ्याच्या बहिणीला घेऊन फरार झाला.

अहियापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनामध्ये पीडित कुटुंबानं लिहिलं आहे की, लग्नानंतर नवरदेवाची अल्पवयीन बहीण बाजारात जाते म्हणून सांगून घराबाहेर पडली. मात्र रात्रभर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही ती सापडली नाही. यादरम्यान, नवरदेवाच्या भाओजींना त्यांच्या मेहुणीला त्यांच्याच गावातील एक व्हिडीओग्राफर घेऊन पळाल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून कुटुंबीय या तरुणीचा शोध घेत आहेत.

मुलीच्या वडिलांनी आरोप केला की, मुलाच्या लग्नात आलेला व्हिडीओग्राफर माझ्या मुलीला घेऊर फरार झाला असल्याची ठाम माहिती आमच्याकडे आहे. बाहेर जाण्यापूर्वी तो त्याच्या घरीही गेला होता. मात्र ही गोष्ट आता त्याचे कुटुंबीय मान्य करत नाही आहेत. दुसरीकडे अहियापूरचे पोलीस अधिकारी रोहन कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र ही संपूर्ण घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close