राज्य/देश

उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक : राळेगाव येथे घडला प्रकार

Spread the love

यवतमाळ / प्रतिनिधी

            जिल्ह्यातील राळेगाव येथे महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेल्या उदय सामंत ( शिंदे गट )  यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली आहे. उदय सामंत हे शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या साठी आयोजित फडणवीस यांच्या सभेला आले असतांना हा प्रकार घडला आहे. एका अज्ञाताने ही दगडफेक केली आहे. अध्याप आरोपी गवसला नसून पोलीस त्याची ओळख पटवत आहे.

यवतमाळ – वाशीम  महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेला उदय सामंत देखील हजर होते. यावेळी एका अज्ञाताने त्यांच्या ताफ्यावर दगड भिरकावला, सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. पोलिसांनी अद्यापही कुणाला अटक केली नाही. पण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

यवतमाळ-वाशिम येथील शेतकरीबहुल मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या पाचवेळा खासदार भावना गवळी यांना हटवून त्यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ-वाशिमची लढत चांगलीच तापली आहे. त्या कुणबी समाजाच्या असून हिंगोलीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत.

यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत आहे. संजय देशमुख हे शिवसेनेचे (UBT) उमेदवार आहेत. काँग्रेस आपली पारंपारिक मुस्लिम, दलित व्होटबँक आपल्या मित्रपक्ष शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवाराकडे हस्तांतरित करू शकते की नाही यावरही निकाल अवलंबून असेल.

या मतदारसंघाने तेव्हापासून झालेल्या तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप उमेदवारांना मतदान केले आहे. यवतमाळ-वाशीममधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेकडे संजय राठोड हा एकच आमदार आहे. भाजपकडे चार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एक आमदार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close