विषय शिक्षक पद स्थापनेसाठी सर्व शिक्षक संघटना एकत्र
यवतमाळ( वार्ता )
यवतमाळ जिल्हा परिषदेतील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन आज दिनांक पाच जानेवारी रोजी मागील सहा वर्षापासून रखडलेल्या विषय शिक्षकांची पदस्थापना व इतर सर्व शिक्षक संघटनांनी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनासोबत चर्चा करून ह्या पदस्थापना त्वरित करण्यासाठी प्रयत्न केले. 30 नोव्हेंबर 2023 ला 29 ऑक्टोबर 2023 च्या पत्रानुसार 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागू नसल्याबाबत स्पष्ट करण्यात आल्यामुळे ही पदस्थापनेची प्रक्रिया त्वरित करावी अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहे.
सदर पत्र दिल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे दिनांक 21 डिसेंबरला पुन्हा एकदा पत्र देऊन टीईटी ची अट शिथिल झाल्यामुळे राज्यातील विविध जिल्हा परिषदेने जसे जि प लातूर, ठाणे ही प्रक्रिया सुरू केल्याचे शिक्षण विभागाच्या निर्देशनास आणून दिले. दिनांक 10 जून 2023 रोजी चा विषय शिक्षक पदस्थापने करिता अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध होऊ नये विविध कारणास्तव ही पदस्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली विषय शिक्षिका अभावी जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक झेडपी उच्च प्राथमिक मराठी शाळांची आठवीची तुकडे तुटण्याच्या मार्गावर आहे. सरळ सेवा पदभरतीआधी जर या पदस्थापना झाल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सहाय्यक शिक्षकांच्या अनुशेष निर्माण होण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींचा सरासरी विचार करता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन विषय शिक्षक पद स्थापनेसाठी आज दिनांक पाच जानेवारीला एक दिवसीय आंदोलन सुरू केले आहे. झेडपी प्रशासनाने त्वरित यावर मार्ग न काढल्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात समन्वय महासंघाचे निमंत्रक रमाकांत मोहरकर, किरण राठोड एसी चौधरी, युवराज गेडाम, शरद भारुड, महेंद्र वेरुळकर, नंदकिशोर वानखडे, मनीष राठोड, शशिकांत लोळगे, नदीम पटेल, कुलदीप डंभारे, जगदीश ठाकरे, गजानन पवार, शेख सय्यद, रफिक, सुनील मनोहर, शशिकांत चाफेकर, सुनिता गुघाने यांनी दिला आहे