सामाजिक

संभाजी भिडे यांच्या विरोधात सर्व संघटना आक्रमक.

Spread the love

विविध सामाजिक राजकीय संघटना केले पोलिसांनी स्थानबद्ध.

यवतमाळ : यवतमाळ येथे संभाजी भिडे यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यवतमाळ विभागाद्वारे बलवंत मंगल कार्यालय येथे आर्णी रोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता.
अमरावती येथील कार्यक्रमांमध्ये महात्मा गांधी यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केलं. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले त्यामुळे यवतमाळ मधील त्यांच्या या कार्यक्रमाला आबेडकरी संघटनांनी व राजकीय पक्षांनी विरोध केला. संभाजी भिडे यांना अटकेची मागणी यावेळी करण्यात आली.अनेक सामाजिक संघटनेने व राजकीय पक्षाने या कार्यक्रमाचा विरोध करून त्यांचे पोस्टर फाडण्यात आले. यावेळी आंबेडकरी जन आक्रोश मोर्चाच्या महिला प्रमोदिनी रामटेके, ॲड.जयसिंग चव्हाण, संगीता पवार, विजय धुळे आशिष खंरतडे, वंचित बहुजन युवा आघाडी चे आकाश वाणी,कुंदन नगराळे,प्रफुल शभरकर, महिला सचिव भारती सावते, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,जावेद अन्सारी, चंदू चौधरी,उषा दिवटे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे व इतर सामाजिक पक्षाने जाहीर त्यांचा निषेध केला रस्त्यावरती उतरून आंदोलन कर्त्यानी नारे लावून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकाना पोलीस स्टेशन अवधूत वाडी येथे स्थानबद्ध करण्यात आले.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे
यांच्या विरोधात यवतमाळ शहरात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शनिवारी भिडे यांची सभा आयोजित केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त पडसाद उमटले आहे.
महापुरुषांविरोधात वादग्रस्त वक्तव्य तसेच नेहमी अतार्किक मुद्दे मांडून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम संभाजी भिडे करीत आहे आणि शासन त्याला पाठबळ देत आहे असा आरोप आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. संभाजी भिडे हे अस्मितेचा ध्वज उभारणीसाठी शहरातील हनुमान आखाडा चौक,लोकमान्य टिळक चौक येथे आले असता तिथे तणाव निर्माण झाला होता. भिडेंचे फलक फाडणाऱ्या कार्यकरताना पोलिसांनी त्याब्यात घेतले होते. व त्यांना पोलीस स्टेशन येथे स्थानाबद्द करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी दिलेली मुलाखत ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हा आनंद करणारी आहे त्यांनी केलेल्या राष्ट्रगृहाच्या निषेधार्थ आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ येथे त्यांच्या फलकाला फाडून त्यांचा जाहीर निषेध केला तसेच निषेध करत असताना शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे यानंतर जर संभाजी भिडे यांना अटक केली नाही किंवा त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close