अकोलापुर्व मधील व पातुर तालूक्यातील अशा सहा तीर्थस्थळाना तिन कोटीचा विकास निधी मंजुर
अकोला / प्रतिनिधी
मतदारांनी दिलेला विश्वास व धर्म संस्कृती पर्यटन विकासासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यातील सहा तीर्थस्थळासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून तसेच नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून विकास तसेच दळणवळण व पर्यटन रोजगाराचा चालना देण्याच्या दृष्टीने व संस्कृती संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अकोला जिल्ह्यातील भक्तांचे श्रद्धास्थान पातुर तालुक्यातील सिदाजी महाराज संस्थान साठी 50 लाख रुपये श्री समर्थ सोमपुरी संस्थान शिरला अंधारे श्रीराम संस्थान पातुर तालुक्यातील तसेच जागेश्वर संस्थान वाडेगाव सोपीनाथ मंदिर विदर्भ आणि मराठवाड्यातील भक्ती स्थान असलेले महसूल व पुरातन महादेव मंदिर केळीवेळी साठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा प्रशासकीय मान्यता निधी उपलब्ध करून खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी तसेच यासाठी आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी विशेष परिश्रम करून मतदारांना दिलेला विश्वास संस्कृती संवर्धन सोबत परंपरा संस्कृती व राष्ट्रीय एकात्मता व ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचं काम करून रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे काम या निमित्ताने केले आहे पाचोड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या सक्रियतेचे आभार व अभिनंदन व्यक्त केले आहे.
पर्यटक विकास निधी अंतर्गत याआधी सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मधील सहा तीर्थस्थळावर निधी उपलब्ध करून दिला होता तसेच जिल्ह्यातील अनेक भागासाठी निधी उपलब्ध करून देऊन धर्म संस्कृती व एकात्मतेचा संदेश दिला होता यानिमित्ताने पातुर तालुक्यातील तीर्थस्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आपली मतदाराबद्दल असलेली कटिबद्धता सिद्ध केली आहे .