सामाजिक

अखिल भारतीय बारी महासंघाने जिल्हाधिकारी यांना राष्ट्रसंत रुपलाल महाराज स्मारक जागेबाबत चर्चा करण्यासाठी मागितली वेळ

Spread the love

अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे

बारी समाजाचे दैवत संत शिरोमणी राष्ट्रसंत श्री रूपलाल महाराज यांचे अंजनगाव सुर्जी) जिल्हा अमरावती येथे प्रस्तावित राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी गेली एक वर्षापासून विविध बैठका व चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांची कर्मभूमी अंजनगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी नुकतीच बारी महासंघाचे विनंती पत्रावरून आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः राष्ट्रीय स्मारकासाठी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना ई क्लास जागेबाबत तसे पत्र देऊन मी जागेबाबत त्वरित अहवाल मागवणार असे कळवले होते त्यानुसार प्रत्यक्षात कामाला सुद्धा सुरुवात झाली त्यावर योग्य जागा ही उपलब्ध व्हावी व जागा निवड करण्यासाठी अखिल भारतीय बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश जी घोलप यांनी नुकतेच जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार अमरावती यांना एक लेखी पत्र देऊन त्यांना जागेबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितला त्यावर जिल्हाधिकारी हे चर्चा विचार विनिमय करण्यासाठी वेळ कधी देणार याकडे बारी महासंघाचे लक्ष लागले आहे ,आगामी काळात स्मारकाचा प्रश्न हा सकारात्मक सुटणार हे निश्चित
3 ऑगस्ट2023 रोजी विधानभवन मुंबई येथे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केलेल्या घोषणा व आश्वासनाला अनुसरून देशातील समस्त बारी समाजाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. व समाजाच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागणीला सरकार सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close