अखेर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टर माईंड जेरबंद
गणेश मारणे याला एलसीबी कडून अटक
प्रतिनिधी / पुणे
शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या जाळ्यात मोठा मासा अडकला आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टर माईंड गणेश मारणे याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मागील अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. नाशिकरोड येथून कॅबने जात असताना पोलिसांनी त्याला पकडलं. शरद महोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने तब्बल दहा पथके स्थापन केली होती, पण गणेश मारणे पोलिसांना चकवा देत होता. गणेश मारणेने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता, पण कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.
दुसरीकडे गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यामुळे पुणे शहर हादरलं. शरद मोहोळवर कोथरूड येथील सुतारदरा परिसरात आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, यात शरद मोहोळचा मृत्यू झाला.
मोहोळ हत्या प्रकरणातले आरोपी
साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय 20), नामदेव महिपती कानगुडे (वय 34), विठ्ठल किसन गांडले (वय 20, तिघेजण रा. सुतारदरा, कोथरूड), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. पर्वती), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय 20, रा. पौड रस्ता, मुळशी), रवींद्र वसंतराव पवार (वय 40, रा. नांदे गाव, ता. मुळशी), संजय रामभाऊ उढाण (वय 43, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड), सतीश संजय शेडगे (वय 28, रा. भूगाव, ता. मुळशी), धनंजय मारुती वाटकर (वय 25, रा. सैदापूर, कराड), नितीन अनंता खैरे (वय 34, रा. गादिया इस्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय 24, रा. पिरंगुट, ता. मुळशी), संतोष दामोदर कुरपे (वय 49, रा. परमहंस नगर, कोथरूड), रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय 36, रा. आंबेगाव, उरवडे, ता. मुळशी), विठ्ठल महादेव शेलार (वय 36, रा. बोथरवाडी, उरवडे, ता. मुळशी), प्रीतसिंग (रा. उमरठी, मध्यप्रदेश) आणि गणेश मारणे (रा. कर्वेनगर) अशी मोका दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.