हटके

आकाशात नवा पाहुणा निशीमुरा धूमकेतू

Spread the love

अकोला/ प्रतिनिधी

आपल्या सूर्यमालेत ग्रह, लघुग्रह, उपग्रह या सारखेच धूमकेतू सुद्धा सूर्यकुलाचेच घटक असल्याने वेगवेगळ्या कालावधीत ते सूर्याला प्रदक्षिणा करीत असतात. त्यात काही नियमित तर काही अनियमित स्वरूपाचे असतात.असाच एक अनियमित स्वरूपाचा गेल्या महिन्यातच नव्याने शोधलेला नवीन धूमकेतू सध्या आपल्याजवळ येत असल्याने, आपल्याला पहाटे पूर्वेला पाहता येईल. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वभारतीचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.
लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र अशीही त्याची ओळख आहे. १२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला असून, त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते. सध्या या धूमकेतूचे सूर्यापासूनचे अंतर ०-८४ खगोलीय एकक एवढे आहे. ११ ऑगस्ट रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समुहात युती झाली. त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू आपल्याला पूर्व क्षितिजावर पाहता येतो. या वेळी त्याची दृश्य प्रत +४.७ असून अंधाऱ्या व निरभ्र आकाश असतांना आणि व्दिनेत्रीमधुन अधिक चांगली दिसेल. या धूमकेतूचे सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे अंतर असते.
११ ते १७ सप्टेंबर या दरम्यान या नव्या धूमकेतूची दृश्यप्रत + २ पर्यंत येत असल्याने पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास पूर्व क्षितिजावर या नवीन पाहुण्याच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, असे ही दोड यांनी म्हटले आहे.
……………

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close