अपघात
आकाश पाळणा कोसळून प्रसिद्ध उद्योगपतींचा मृत्यू

सोलापूर / नवप्रहार ब्युरो
पर्यटनाचा अँड लुटण्यासाठी लोक पावसाळ्याच्या सुरवातीला पसंती देतात.कारण हवेत थोडाफार गारवा आलेला असतो. शिवाय पर्यटनस्थळी मनोहर दृश्य ,फुलांनी बहरलेली झाडे यामुळे वातावरण आणखीच मनमोहक बनते. या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
पावसाळ्यामध्ये वॉटर पार्कमध्ये जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे, अकलूजमधल्या अशाच एका प्रसिद्ध वॉटर पार्कमधल्या एडव्हॅन्चर राईडचा पाळणा कोसळला आहे, या अपघातात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत.
अकलूजच्या सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. वॉटर पार्कमध्ये असलेला फिरता पाळणा पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. वॉटर पार्कमधला पाळणा निसटून पडल्यामुळे हा अपघात झाला. भिगवण येथील तुषार धुमाळ नावाच्या व्यावसायिकाचा या अपघातात मृत्यू झाला असून आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातल्या एकाची मान फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे
अपघातामध्ये तुषार धुमाळ गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने अकलूजच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. धुमाळ हे भिगवण येथील प्रसिद्ध एलआयसी उद्योजक आहेत.
अपघातानंतर रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला? वॉटरपार्कमधल्या राईडची डागडुजी केली होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1