विदेश

AI ने महिलेच्या फोटो सोबत केले असे …..

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

                      विज्ञान शाप की वरदान हा नेहमीच वादविवादाचा विषय राहिला आहे. कारण प्रत्येक गोष्टी च्या चांगल्या परिणामा सोबत त्याचे विपरीत परिणाम देखील पाहायला मिळतात. त्यामुळे तांत्रिक विकास होत असताना हाच विकास काही वेळा डोकेदुखी सुद्धा ठरत आहे. एका उच्च पदस्थ व्यक्ती सोबत देखील असे घडले आहे. 

हल्ली सर्वत्र AI चा बोलबाला आहे. सगळ्याच कामासाठी लोक आता AI वापरु लागले आहेत. ज्यामुळे लोकांची बहुतांश काम सोप झालं आहे. कोणतंही फोटो बनवून देण्यापासून ते व्हिडीओ एडिॉ करणे आणि नवीन कन्टेट क्रिएट करण्यापर्यंत बहुतांश काम हे AI करतं.

पण टेक्नोलॉजी जितकी समृद्ध होते किंवा पुढे जाते तितकीच ती धोकादायक देखील ठरते.

असंच काहीसं AI ने केलं आहे. AI नं गुगल, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या कंपन्यांमध्ये काम केलेल्या एलिझाबेथ लाराकी यांच्या फोटोला अशापद्धतीनं बनवून दिला की तो वादाचा विषय बनला आहे.

एलिझाबेथ लाराकी यांनी AI कॉन्फरन्सच्या आयोजकांवर मोठा आरोप केला आहे. तिचा आरोप आहे की कॉन्फरन्सच्या जाहिरातीतील चित्रात, आयोजकांनी तिचे खरे चित्र वापरले आहे ज्याला AI मार्फत एडिॉ करुन त्यात ब्रा जोडली आहे.

ती म्हणाली, ती या वर्षाच्या शेवटी एका परिषदेत सहभाग होणार आहे आणि त्यात ती स्पिकर देखील असणार आहे.आणि त्यासाठी आयोजकांनी एक जाहिरात केली होती, पण जेव्हा तिने जाहिरातीत तिचे फोटो पाहिले तेव्हा तिला काहीतरी विचित्र वाटले.”

लाराकीने दावा केला की फोटोमध्ये तिच्या शर्टचे खिसे काढण्यात आले होते. शिवाय तिच्या शर्टाचे बटण उघडे केले होत, ज्याला एक ब्रा जोडली गेली होती. ती म्हणाली, “मी जाहिरातीत माझे फोटो पाहिले आणि मला वाटले, हे बरोबर दिसत नाही. माझ्या फोटोत ब्रा आहे जे खूपच विचित्र दिसतंय?”

लाराकीने सांगितले की, जेव्हा तिने तिचे मूळ चित्र आणि जाहिरातीत वापरलेले चित्र पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की चित्रात ब्रा जोडली गेली आहे. ती म्हणाली, “कोणीतरी माझे फोटो मिळवले आणि त्यात शर्टाचे बटण उघडले आणि ब्रा जोडली.”
 

 

या प्रकरणाबद्दल लाराकी यांनी कॉन्फरन्स आयोजकांशी संपर्क साधला, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि स्पष्ट केले की त्यांच्या सोशल मीडिया टीमने एआय वापरून चित्र संपादित केले होते. आयोजक म्हणाले की AI चा वापर फोटो तयार करण्यासाठी केला गेला होता, परंतु महिलांच्या चित्रांचे लैंगिकीकरण करण्याकडे AIचा कल होता. हे आमच्या लक्षात आले नाही.

लाराकीच्या पोस्टला 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले, “ही एक मनोरंजक कथा आहे, जी महिलांच्या चित्रांचे लैंगिकीकरण करण्याच्या आमच्या संस्कृतीची प्रवृत्ती दर्शवते.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close