Uncategorized

अहो ती बिकनी गर्ल तर चक्क मगरी सोबत पोहण्याचा घेत आहे आनंद

Spread the love

अहो ती बिकनी गर्ल तर चक्क मगरी सोबत पोहण्याचा घेत आहे आनंद

          मगर हा हिंस्रक पशु पैकी एक आहे. पाण्यात असतांना याची ताकद फारच वाढते. मगरीच्या जबड्यात एकदा का भक्ष अडकले की मग त्याच्या पासून स्वतःला वाचवने फारच अवघड होऊन बसते.एखादा चमत्कार झाला तरच मगरीच्या तावडीतून वाचता येते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ भयंकर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओ मध्ये एक बिकनी गर्ल मगरी सीबत पोहताना आणि तिच्या सोबत खेळतांना दिसत आहे.

माणूसच नाही तर जंगलचा राजा सिंहदेखील मगरीपासून चार हात दूर राहण्यात आपलं भलं मानतो. पण आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक बिकिनी गर्ल चक्क मगरीसह निर्भयपणे समुद्रात पोहताना दिसतेय. त्याच वेळी मगरही तिच्यासोबत काही दिसत नसल्याप्रमाणे वागताना दिसतेय. व्हिडीओमध्ये तुम्ही एक तरुणी मगरीसोबत अगदी आरामात मस्ती करताना पाहू शकता. यादरम्यान ही तरुणी मगरीला पोटाला पकडतानाही दिसतेय. पण तरीही मगर तिच्यावर हल्ला करत नाही. या व्हिडीओवरून तरुणी आणि मगरीमध्ये एक घट्ट मैत्री असल्याचे म्हटले जातेय.

 

 

 

 

मगर आणि बिकिनी गर्लचा हा व्हिडीओ @gatorboys_chris या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही यूजर्सच्या म्हणण्यानुसार, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बिकिनी गर्लचे नाव गॅबी निकोल असे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मगरींची काळजी घेत आहे. यादरम्यान तिची मगरींसोबत एक चांगली मैत्री झाली आहे. यामुळे अनेकदा ती मगरींसोबत पाण्यात एकत्र मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.

८ मार्च रोजी तिने सोशल मीडियावर मगरीसोबतचा हा व्हिडीओ शेअर केला होता, जो आता चांगलाच व्हायरल होत आहे. जो आतापर्यंत ४ लाखांहून अधिक यूजर्सनी पाहिला आहे. तसेच अनेक यूजर्सनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘बघ, नाही तर मगर तुला खाऊन टाकेल.’ तर दुसऱ्या यूजरने कमेंट करत म्हटले की, ‘हे लोक प्राण्यांनाही शांततेत राहू देत नाहीत.’ याशिवाय आणखी एका यूजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, ‘मृत्यूला कवटाळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.’

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close