Uncategorized

अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात

Spread the love

 

नगर  / प्रतिनिधी

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव साजरा करण्याची शतकी पारंपरा कायम आहे. जिल्हा मराठा संस्था रुजविण्यासाठी चौथे शिवाजी महाराजांनी जे प्रयत्न केले. त्यांच्या स्मृतींना उजळा देण्यासाठी तसेच संस्था उभारणीत दिवंगत संस्था पदाधिकार्‍यांच्या स्मृती जगविण्यासाठी जिल्हा मराठा संस्था 100 वर्षापासून दसरा महोत्सव साजरा करत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे संस्थेचे दसरा महोत्सवात केले.

अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव प्रसंगी उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, खजिनदार अ‍ॅड. दिपलक्ष्मी म्हसे पा., सचिव विश्‍वासराव आठरे पा., सहसचिव जयंत वाघ, विश्‍वस्त जी.डी.खानदेशी, सिताराम खिलारी पा., मुकेश मुळे, कल्पना वायकर, माधवेश्‍वरी म्हसे, अलकाताई जंगले, दिपक दरे, राजेंद्र मोरे, राधाकृष्ण आढाव, अ‍ॅड. माणिकराव मोरे, अ‍ॅड. सुभाष भोर, अर्जुन पोकळे आदी उपस्थित होते.

यावेळी दरे बोलतांना म्हणाले की, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी हा संस्थेचा आत्मा आहे. सर्वाच्या सहकार्याने आपण राज्यात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहोत. बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष कृतीवर आम्हा शिक्षण पदाधिकर्‍यांचा भर असतो. त्यास तुम्हा सर्वांची साथ मिळत आहे. यावेळी जी.डी.खानदेशी आपले मनोगत व्यक्त केले व अ‍ॅड.विश्‍वासराव आठरे यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.

राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर यश मिळविलेल्या तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक यांचा संस्था पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक विजयकुमार पोकळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.रविंद्र दवडे व श्री.प्रशांत ढगे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.बी.बी.सागडे यांनी केले.

अहमदनगर जिल्हा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव प्रसंगी ाष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर यश मिळविलेल्या तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक यांचा सन्मान करतांना अध्यक्ष रा.ह.दरे, उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर, खजिनदार अ‍ॅड. दिपलक्ष्मी म्हसे पा., सचिव विश्‍वासराव आठरे पा., सहसचिव जयंत वाघ, विश्‍वस्त जी.डी.खानदेशी, सिताराम खिलारी पा., मुकेश मुळे आदी. (छाया: सागर इंगळे)

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close