शैक्षणिक

अहमदनगर महाविद्यालयात माधवा मॅथेमॅटिक्स गणिते या विषयावर कार्यशाळा संपन्न

Spread the love

 

नगर – अहमदनगर महाविद्यालय गणित विभाग व भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने अहमदनगर कॉलेज येथ माधवा मॅथेमॅटिक्स गणिते या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर. जे. बार्नबसयांच्या शुभहस्ते संपन्न झाले व त्या कार्यशाळेचा समारोप माधवा गणित कॉम्पिटिशन या स्पर्धेचे राष्ट्रीय पातळीवरील मुख्य समन्वयक डॉक्टर शोलापूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या दोन्ही कार्यक्रमासाठी अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. भालसिंग, डॉ. नोएल पारगे, विना अनुदानित विषयाचे मुख्य समन्वयक डॉ. सय्यद रज्जाक हे उपस्थित होते .

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य आर. जे. बार्नबस बोलतांना म्हणाले की, गणित हा विषय सर्व विज्ञानाचा मूलभूत पाया आहे. गणिताशिवाय कोणतेही विज्ञान शिकता येणार नाही. म्हणून गणित हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि या विषयाची प्रसार व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये या विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी भास्कराचार्य प्रतिष्ठान चांगले प्रयत्न करीत आहे याबद्दल सरांनी त्यांचे आभार मानले.

या कार्यशाळेत अहमदनगर शहरातील सारडा महाविद्यालय राधाबाई काळे महाविद्यालय व अहमदनगर कॉलेजमधील गणित या विषयाचे पदवी पूर्व वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेली आहे. अशी कार्यशाळा अहमदनगर महाविद्यालयात गणित विभागाच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेली होती.

या कार्यक्रमासाठी प्राध्यापक सुरेश घुले ,प्राध्यापक सुरेश गंदाले व प्राध्यापक रोहिदास देवढे, प्राध्यापिका प्रज्ञा दिवटे व गणित विषयातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व ही कार्यशाळा यशस्वी केली. नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स यांनी यावर्षीपासून राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या गणित परिषदेसाठी गणितातील गुणवंत विद्यार्थ्यांचे निवड ही माधवा गणित स्पर्धा परीक्षेतून निवड करण्यात येणार आहे. माधवा गणित स्पर्धा परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे व अहमदनगर जिल्ह्यासाठी अहमदनगर कॉलेज गणित विभाग हे यासाठी मुख्य केंद्र आहे. डॉक्टर शोलापूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर माधवा गणित परीक्षेसाठी अहमदनगर विभाग हा नेहमी सर्वात जास्त संख्येने भाग घेणारे केंद्र अशी अहमदनगर कॉलेजची प्रसिद्ध आहे.

,    या कार्यशाळेसाठी पुणे येथील स. प. महाविद्यालय येथील गणित विभागप्रमुख डॉ. गीतांजली पाठक तसेच जामखेड महाविद्यातील गणित विभाग प्रमुख डॉ. पुराने तसेच कर्जत दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील गणिती युवक प्रमुख डॉक्टर म्हस्के सिटीबोरा कॉलेज शिरूर येथील गणित विभाग प्रमुख डॉक्टर स्वप्निल काळे प्राध्यापक बांधले प्राध्यापक देवढे या प्राध्यापकांनी प्या विषयातील तज्ञ व्याख्याते म्हणून भाग घेतला व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन केले त्यांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यास खूप खूप फायदा झाला.

याप्रसंगी सारडा कॉलेजमधील काही विद्यार्थी तसेच राधाबाई काळे महिला महाविद्यालय येथील विद्यार्थी व नगर कॉलेजमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी सांगितले या कार्यशाळेचा आम्हास आमच्या जीवनामध्ये व आमच्यामध्ये गणिताची आवड निर्माण करण्यास निश्‍चितच उपयोग होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
I3