अहिल्याबाई होळकर जयंती दिनी दोन महिलांचा गौरव
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
आज दिनांक 31/5/2023 रोजी ग्रामपंचायत गुंजी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जयंती निमीत्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार दोन महिलांना वितरित करण्यात आला त्यात पुरस्काराचे पहिले मानकरी महिला आशा रामेशराव शिरपूरकर व पूजा देवेन्द्र जाधव यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच 12 वि मध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थाना शाल व श्रीफळ देऊन ग्रामपंचायत} सरपंच व उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांचा तर्फे रोख बक्षिस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराचे मानकरी सुहानी नंदकिशोर कडे व प्रणय संजय निमकर यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच राजूभाऊ पवार उपसरपंच विनीत टाले सदस्य नितीन शिरपूरकर,बादल वंजारी,मनीषाताई ठाकरे शोभाबाई पाटील,वैष्णवी मेहकर,यशोधरा सोनोने माजी पोलीस पाटील राजेंद्र टाले समस्त सर्व गुंजी गावकरी महिला व पुरुष मंडळी उपस्तीत होते