हटके

उमरेड येथील रिसॉर्ट नंतर आता नागपूरच्या हॉटेल मध्येही  तोकड्या कपड्यात तरुणीचा डान्स

Spread the love

उपस्थितांकडून  नोटांची उधळण 

नागपूर / विशेष प्रतिनिधी

  काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हयातील उमरेड तालुक्यातील  करांड येथील हॉटेल परडाईज रिसॉर्ट येथे तरुणीच्या तोडक्या कपड्यातील डान्स आणि तेथे उपस्थितांनाकडून तरुणीवर केल्या गेलेली नोटांची उधळण आणि तरुणीकडून उपस्थितांना वाढण्यात आलेला मद्य  हा विषय जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात चर्चिला गेला होता. आता असाच प्रकार नागपूर येथे घडला आहे.

               काही कालावधी पूर्वी मुंबई सारख्या महानगरात डान्स बार सुरू होते. दिवंगत आबा हे गृहमंत्री असतांना त्यांनी त्यावेळेस डान्सबार बंद केले होते. आणि त्यावेळेस बारबालांची छमछम काही काळासाठी थांबली होती.त्यानंतर आलेल्या अनेक सरकारने यावर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला पण आजही मुंबईत लपूनछपून डान्सबार सुरू आहेत. महानगराची हीच प्रथा आता सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नागपूर शहरात काही धनाढ्य मंडळी रुजू करू इच्छित आहेत.

नागपूरच्या वर्धा रोडवरील शहराच्या वेशीवर असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. येथे तोकडे कपडे घालून एक तरुणी डान्स करत होती. तर दुसरीकडे कोर्पोरेट कर्मचारी तिच्यावर पैशांची उधळत करत होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अश्लील नृत्यासमोर कॉर्पोरेटमध्ये कर्मचारी मौज मजा करताना दिसत आहेत. कंपनीसाठी चांगलं काम करणाऱ्यांना डीलरसाठी या पार्टीचे आयोजन झाल्याची माहिती मिळत आहे

मात्र अशा पद्धतीने अश्लील नृत्य करत पैशाची उधळण करणारा हा व्हिडिओ धक्कादायक आहे. काही कर्मचारी अति उत्साहाच्या भरात तिथे उपस्थित असलेल्या तरुणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते तर अनेक जण हातात मोबाईल धरून तिचे हे अश्लील नृत्य रेकॉर्ड करत होते.

बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close