मुलाच्या वागण्याचा बापाला आला वैताग मुलाला केले जीवनातून बाद
कृऱ्हाडीने खून करत कटरच्या साह्याने केले शरीराचे तुकडे
तुकडे पोत्यात भरून फेकले तलावात , स्वतःच पोहोचला ठाण्यात .
सांगली / नवप्रहार मीडिया नेटवर्क
मुलगा बरोबरीचा झाला की त्याने काही कामधंदा करावा जेणेकरून कुटुंबाला मदत होईल अश्या अपेक्षा प्रत्येक पालकांना असतात. पण ज्याच्या कडून अपेक्षा आहेत तोच जर उलटा वागत असेल तर आई बापाला कमालीचा मनस्ताप होतो. अश्याच मनस्ताप झाल्याने एका बापाने आपल्या मुलाला कुऱ्हाडीचे घाव घालत संपवले आहे. त्यानंतर कटरच्या साह्याने शरीराचे तुकडे करत पोत्यात भरून तलावात फेकले. आणि स्वतःच ठाण्यात पोहचला.
मिरजमधील गणेश तलाव लक्ष्मी मंदिराजवळ राहणाऱ्या राजेंद्र हंडिफोड यांचा मुलगा रोहित हांडीफोडला जुगार आणि व्यसनाधीन होता. आपल्या व्यसनाची तलाप पूर्ण करण्यासाठी तो घरामध्ये त्रास देऊ लागला होता. कुटुंबातील सर्वांनाच अशा प्रकार त्रास देऊ लागल्याने सर्वजण त्याला वैतागले होते. एक दिवशी संतापलेल्या वडिलांनीच त्याचा कायमचाच काटा काढला.
रोहितच्या वडिलांनी त्याचा कुऱ्हाडीने खून केला, बापाच्या मनाला इतकंच करून काही राहावलं नाही. मुलाला वैतागून गेलेल्या बापाने त्याला संपवलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले. कटरच्या मदतीने त्याने आपल्याच पोटच्या मुलाला संपवून टाकलं. शरीराचे तुकडे शेवटी पोत्यात भरले आणि काही तुकडे गणेश तलाव येथे फेकून दिले असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
आरोपी बापाने मुलाचा खून केल्यानंतर मिरज शहर पोलिसांमध्ये जात आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांना त्यांनी सर्व काही सांगितल्यावर त्यांची पळापळ सुरू झाली. मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा मिरज पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस फौज फाटा सुभाष नगर शिंदे हॉल आणि गणेश तलाव परिसरात दाखल झाला होता.
दरम्यान, आरोपी बापाने आपल्या मुलाला संपवलं आणि कबुलीही दिली. मात्र त्याच्या चेहऱ्यावर आपण केलेल्या कृत्याच्या लवलेशही दिसला नाही. मात्र या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण झालं होतं.मुलाची ती एक सवय बापाच्या मस्तकात गेली आणि शेवटी वडिलांनीच मुलाचा खून केला.