विशेष

नागाचा मृत्यू झाल्यावर नागीण नागाच्या मृतदेहाजवळ होती ठाण मांडून 

Spread the love

शिवपुरी (एमपी)/ नवप्रहार ब्युरो

                         नाग – नागीण च्या जोडी ला घेऊन अनेक किवंदत्या आहेत. नाग – नागीण पैकी कोणाला एकाला मारल्यास उरलेला जोडीदार आपल्या जोडीदाराचा बदला घेतात असे देखील सांगण्यात येते. नाग- नागीण च्या प्रेम कथांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना मध्यप्रदेश च्या शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नागाचा मृत्यू झाल्यानंतर नागिण त्याच्या मृतदेहाजवळच थांबते. तासभर ती त्याच्या मृतदेहापासून हलत नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्री गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात साफसफाईचे काम सुरू होते. या कामासाठी जेसीबी मशिन बोलाविण्यात आले होते. जेसीबी मशिन वेगाने काम करत होती. दरम्यान, जेसीबीच्या फावड्यातून जमिनीच्या आतील छिद्रात लपलेल्या सापांची जोडी बाहेर आली. दुर्दैवाने जेसीबीच्या धडकेत नागाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत नागीणही गंभीर जखमी झाली आहे.

या घटनेनंतर जेसीबी मशीन ऑपरेटरने काम बंद केले. शेतमालक व इतरांच्या वतीने सर्पमित्र सलमान पठाण यांना तात्काळ पाचारण करण्यात आले. त्यानंतर ही माहिती पसरताच लोक घटनास्थळी जमा झाले. घटनास्थळी पोहोचलेले सर्पमित्र सलमान पठाण यांना जखमी साप आपला साथीदार नागाचा मृतदेह सोडण्यास तयार नसल्याचे दिसले. मोठ्या कष्टाने त्यांनी सापाला घटनास्थळावरून बाहेर काढले. सर्पमित्र सलमान पठाण यांनी सापावर प्रथमोपचार करून सोडून दिले.

सर्पमित्र सलमान पठाण यांनी सांगितले की, साप बरा होताच त्याला जंगलात सुखरूप सोडण्यात येईल. घटनास्थळी सापडलेल्या खुणा पाहता हे साप आणि नाग वर्षानुवर्षे एकत्र राहत होते, असे दिसते. हिवाळ्याचा ऋतू या प्राण्यांसाठी जीवघेणा असतो, त्यामुळे ते जमिनीच्या आत, बिळात किंवा दरीत राहतात. सापाचा मृत्यू आणि सापाला इजा झाल्याची घटना दु:खद आहे. सापाच्या मृत्यूनंतर मृत सापाच्या मृतदेहाजवळच नागीण थांबून राहणं औत्सुक्याचं आहे. सा.नवप्रहार  या घटनेच्या सत्यतेला दुजोरा देत नाही. आम्ही फक्त व्हायरल व्हिडिओची माहिती देत आहोत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close