हटके

१४ वर्षांनी आलेल्या आनंदावर रुग्णालयाच्या तगादयामुळे पडले विरजण 

Spread the love

नवी मुंबई  / नवप्रहार डेस्क 

               लग्न झालेल्या जोडप्याला आपण आईवडील व्हावे असे वाटत असते. प्रत्येक स्त्रीला तर आई म्हणवून घेणे ही त्यांची प्राथमिकता असते. किंबहुना घरातील ज्येष्ठ मंडळीला aaji- आजोबा कधी होऊ असा प्रश्न पडलेला असतो. नवऱ्याच्या बहिणीला आणि नवरीच्या भावाला आत्या आणि मामा होण्याची आतुरता असते. तर नवरी मुलीच्या मैत्रिणी आणि जवळच्या महिला ‘ आनंदी वार्ता ‘ कधी देशील म्हणून तिची मजा घेत असतात.

         एखाद्या जोडप्याला लग्नाच्या १४ वर्षां पर्यंत जर अपत्य होत नसेल तर त्यांना समाज आणि कुटुंबातील लोकांचे मुख्यतः मुलीला काय काय बोलणे ऐकावे लागतात हे तिचे तिलाच माहीत. यानंतर एखाद्या जोडप्याला जर मूलबाळ होत असतील तर त्याचा आनंद त्यांनाच माहीत असतो. ऐका जोडप्याला लग्नाच्या १४ वर्षानंतर जुळे झाले. हे जोडपे त्या क्षणाचा आनंद उपभोगत असताना रुग्णालयाच्या तगाद्या मुळे या जुळ्यांच्या वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले. १४ वर्षांनी घरात आलेला आनंद शोकात बदलला. पण आता त्या जुल्यांच्या नशिबी लोकांचे काय काय टोमणे ऐकावे लागतील हे येणारा काळातच समजणार आहे.

नवी मुंबईत वास्तव्यास असलेलं गाढे कुटुंब. गाढे दाम्पत्य जीवापाड कष्ट करून स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत होते. लग्नाला अनेक वर्ष झाली तर आयुष्यात नव्या पाहुण्यांच्या आगमनाची दोघेही आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर लग्नाच्या 14 वर्षांनी गोड बातमी आलीच. गाढेंच्या घरात पाळणा हलला. पत्नीनं गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्माला आल्यानंतर नवजात बाळांची तब्येत काहीशी नाजुक होती. त्यांना उपचारांची गरज होती. जुळ्या बाळांची तब्येत नाजूक असल्यानं दोघांनाही नेरुळच्या तेरणा रुग्णालयातील अति दक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.

नेरुळमधील तेरणा रुग्णालयात गाढे दाम्पत्याच्या बाळावर उपचार सुरू होते. तर, दुसरीकडे रुग्णालयाकडून सातत्यानं बिल भरण्यासाठी तगादा लावला होता. नरेंद्र गाढेंनी सुरुवातीला 90 हजार रुपये भरले. पण तरिदेखील रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार बिल द्या, असा तगादा लावला जात होता. एवढंच नाहीतर आधी बिल भरलं नाही तर, बाळांवर सुरू असलेले उपचार थांबवले जातील, असंही रुग्णालयाकडून सांगितलं गेलं. अखेर रुग्णालय प्रशासन आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या नरेंद्र गाढेंनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

बाळांचे वडील नरेंद्र गाढेंनी गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयानं वारंवार बिल भरण्यासाठी तगादा लावला होता. यातून नरेंद्र गाढे यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरावं असंही गाढेंकडून नमूद करण्यात आलं आहे. नरेंद्र गाढे नेरुळमधील मनपा वाचनालयात सुरक्षा रक्षकाचं काम करत होते. लग्नानंतर तब्बल 14 वर्षांनी नरेंद्र गाढेंच्या घरात पाळणा हलला होता. पण, बाळांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांच्यावर उपचारांची गरज होती. नरेंद्र गाढेंनी पत्नी आणि जुळ्या मुलांना उपचारासाठी नेरूळ येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी ठेवलं होतं. पण, रुग्णालय प्रशासनानं बिलासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून गाढे यांनी टोकाचं पाऊल उचललं. रुग्णालय प्रशासनामुळे गाढे यांनी त्यांच्या मुलांसाठी पाहिलेली अनेक स्वप्न अपूर्णच राहिली. दरम्यान, या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तेरणा रूग्णालयाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close