व्यसन उपचार शिबिराला ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद
–११५ रुग्णांनी केला दारूमुक्त होण्याचा निर्धार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात वसलेल्या विविध गावातील व्यसनी रुग्णांना वेळेवर व्यसन उपचार मिळावे यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे गाव पातळीवर व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. नुकतेच जिल्ह्यातील विविध गावात पार पडलेल्या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत एकूण ११५ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे आयोजित शिबिरात १८ रुग्णांनी पुर्ण उपचार घेतला. पेशंटची केस हिस्ट्री प्रभाकर केळझर तर समुपदेशन व मार्गदर्शन छ्त्रपती घवघवे यांनी केले. शिबीराचे नियोजन भास्कर कड्यामी यांनी केले. सोबत स्पार्क कार्यकर्ता जिवन दहिकर होते. शिबिर यशस्वीकरीता ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा,गाव पाटील देवराव पदा, अरविंद वडदा, कविता वडदा यांनी सहकार्य केले. कोरची तालुक्यातील दवंडी येथे गाव पातळी उपचार शिबीर आयोजन करण्यात आले. यात १२ जणांनी उपचार घेतला. सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका चेक येथील शिबिरातून १५ पेशंटने उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील एकोडी येथे १८ पेशंटनी पूर्णवेळ उपचार घेतला आहे. शिबिराचे नियोजन आनंद सिडाम यांनी केले. कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव (गेवर्धा) येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण १९ पेशंटनी उपचार घेतला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम सार्वजनिक गोटुल टिटोळा या गावात १८ पेशंट ने उपचार घेतला आहे. रुग्णाची नोंदणी स्पार्क कार्यकर्ता उत्कर्ष राऊत यांनी केली. रुग्णाची केस हिस्ट्री संयोजक दशरथ रमकाम यांनी तर रुग्णाचे समुपदेशन व ग्रूप शेषन समुपदेशक पुजा येलूरकर यांनी घेतले. गावं पातळी क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार यांनी केले. क्लिनिक यशस्वी करण्याकरिता मुक्तीपथ गाव संघटन सदस्य तींगरा वेळदा, आशा वर्कर छायाताई जेट्टी, अशोक दोरपेती, दिलीप मडावी, मुख्याध्यापक एल बी गुंडरू, बी एम वेळदा यांनी परिश्रम घेतले. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथील शिबिराच्या माध्यमातून १५ रुग्णांनी उपचार घेतला.