आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी व करुणा बहुउद्देशीय विकास संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आदर्श एकता सामाजिक संघटना आर्वी व करुणा बहुउद्देशीय विकास संस्था आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानमालाच्या प्रमुख मार्गदर्शक इंजिनिअर सतीश दादा पेंदाम राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड हे होते या व्याख्यानमालेचा विषय प्रजासत्ताक भारतात लोकशाही धोक्यात हा होता. या प्रसंगी सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी अब्रार खान, अडँ अरविंद काळे, प्रा. गणेश मस्के सर यांचा सत्कार करण्यात आला.दिनांक 28 जानेवारी 2024 ला व बाल कलाकार यांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीत म्हटले.गांधी चौक आर्वी येथे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आर.आर.पाटील कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप पखाले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. विजयाताई मुळे तर प्रमुख अतिथी शेख जमीर उर्फ जम्मु भाई कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नानकसिंग बावरी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हंसराजजी शेंडे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक रवींद्र दारुंडे बाळाभाऊ जगताप राजू होले प्राध्यापक पंकज वाघमारे मेघराजजी डोंगरे दशरथ जाधव कमलेश कांबळे सुरज लांडगे अनिरुद्ध देशपांडे रोहन हिवाळे नंदाताई मनवर आनंद वंजारी मोहम्मद जमील शेख आयुब प्रकाश बनसोड सुरेंद्र धुर्वे रुपेश शिंगाडे प्रफुल काळे मंगेश प्रधान मधुकर सवाडे प्रफुल कांबळे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाला संबोधित करताना इंजिनिअर सतीश दादा पेंदाम यांनी सांगितले की भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाच्या रक्षणासाठी समोर यायला हवे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकशाही नव्हे तर संविधान धोक्यात आहे ज्या संविधानामुळे आपल्याला सर्व हक्क अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे याप्रसंगी सुंदर कार्यक्रम आयोजित केला म्हणून आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर भोगे व करुणाताई दाभणे व कार्यक्रमाचे आभार विनोद कांबळे तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम अशोकराव कुंभारे अध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी बालकलाकारांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संदीप सरोदे आकाश मुन, अनिल तायडे, भूषण,दुर्योधन गोंडाणे दिनेश सिंगणापूर, विनोद सरोदे, राजू डोंगरे,.विजय कुंभारे नरेश निनावे,निर्मला कुंभारे, चंदा डोंगरे दुर्गा कांबळे,चंदा सरोदे,शुभांगी कुंभारे..
आदर्श एकता सामाजिक संघटना व इतर सर्वांनी मदत केली.