Uncategorized

अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक हे आहे कारण 

Spread the love

हैदराबाद / नवप्रहार डेस्क 

            दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. येथील संध्या थिएटर मध्ये 4 डिसेंबर रोजी झालेल्या गोंधळ प्रकरणात  अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता.

या घटनेत अनेक लोकांना दुखावत झाली. यात त्या महिलेच्या आठ वर्षांच्या मुलाला देखील दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेसाठी अल्लू अर्जुन आणि थिएटरचं सगळं काम सांभाळणाऱ्यांवर तक्रार दाखल केली होती. तर ज्या महिलेचं या चिंगराचेंगरीत निधन झाले तिचे नाव रेवती असल्याचं म्हटलं जात आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला.

खरंतर ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनची लोकप्रियता इतकी वाढली होती की सगळ्यांना त्याचं वेड लागलं. सगळे त्याला पाहण्यासाठी तो जिथे आहे तिथे जाऊ लागले. अशात जेव्हा ‘पुष्पा-2’ प्रदर्शित झाला त्यानंतर अल्लू अर्जुन हा चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचला. दरम्यान, यावेळी एवढ्या संख्येनं लोक गर्दी करतील अशी अपेक्षी अल्लू अर्जुनला नव्हती. दुसरीकडे अल्लू अर्जुन तिथे आलं हे कळताच तिथे लाखोच्या संख्येनं लोकांनी गर्दी केली. त्यामुळे ही दुखद घटना घडली आणि त्यात त्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला.

 

 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला चिकडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

दरम्यान, या गोंधळात ज्या महिलेचा जीव गेला. त्या महिलाच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याचा निर्णय अल्लू अर्जुननं घेतला असून तो पाठिंबा देत पुढे आला आहे. त्यानं या घटनेवर वाईट वाटत असल्याचं सांगत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची घोषणा करत 25 लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचं म्हटलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close