अपंगाच्या मागण्या घेऊन प्रहार कार्यकर्ते धडकले बीडीओ कार्यालयावर
*तालुक्यातील ग्रामपंचायत च्या ५ टक्के लाभापासून अपंग वंचित
घाटंजी ता. प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
आज दि.१/३/२४ रोजी घाटंजी तालुक्यातील अपंगाच्या विवीध मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पंचायत समिती बीडीओ कार्यालयावर धडकले. शासन निर्देश नुसार ग्राम पंचायत ला येणा-या निवळ उत्पन्नाचे ५% रक्कम ही अपंग कल्याणासाठी व अपंगाच्या विवीध कल्याणकारी योजनासाठी खर्च कराची कहते तसी माहीतीही ग्रामसभेत अपंगांना देऊन त्यांचे समोउपदेशन करणे, अपंगास व्हीलचेअर, आरोग्य सुविधा,स्वच्छता गृह, चरकुला यासारखी विवीध योजना पुरवणे आणी ग्रामपंचायत निवळ उत्पन्नातून ५% लाभ देणे हे अनिवार्य अस्ताना घाटंजी तालुक्यातील ब-याच ग्राम पंचायत नी या लाभ वाटप न करता अपंग माता/बगिणी/ बांधवास या त्याचे हक्क व लाभापासून वंचित ठेवले आहे.या साठी घाटंजी प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख सुरज हेमक,निलेश भगत,रामलाल सुरडकर, किशोर तोडसाम,प्रशांत मडावी, रामदास जुमनाके,संदीप मेश्राम, अविनाश राऊत,गौरव काकडे,नयन भोयर,स्वप्निल नैताम,इंद्रराज वाढई, दवन लढे,सचिन कर्णेवार,आशिष भोयर वह ईतरही प्रहार कार्यकर्ते यांनी केली.
दीव्यांग,अपंग साठी गावातील उत्पन्नवर ५% निधी राखिव असतो मात्र दिव्यांग बांधव हा समाजातील दुवा मानला जात असतांना एकी कडे ‘सरकार दिव्यांगाच्या दारी’ हा उपक्रम राबऊन दिव्यांगास न्याय मिळऊन देत असतांना घाटंजी ता. कर्मचारी हे निद्र अवस्थेत असून दिव्यांगाच्या हक्काचा निधी वाटपात वेळकाढू धोरण राबवतांना दिसतात. त्यामूळे ब-याच दीव्यांगास नाहक त्रास सहन करत आपल्या हक्कापासून वंचित राहव लागत आहे.
येत्या कासी दिवसांत तालुक्यातील ग्रामपंचायत ला हा लाभ दिव्यांगास न वाटप झाल्यास वंचित दीव्यांगास घेऊन ईलाजास्तव प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतिने तालुक्यात तिव्र आदोलन करुंन रस्त्यावर उतराव लागेल हे नमुुद करण्याात आले.