वाहतुक पोलीसांची कामगिरी – हुल्लडबाजी करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर कार्यवाही.
नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे
दि. २५/०६/२०२३ रोजी आयटी पार्क जवळ, हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमानंतर, काही दुचाकी वाहन चालक यांनी झुंड तयार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहनावर ट्रिपल सिट, विना हेल्मेट, वाहने रॅश ड्रायव्हींग करून व वाहनावर हुल्लडबाजी व आरडाओरड करून स्वतःचे व लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे त्यांचे वाहने हयगयीने, निष्काळजीपणे व बेदरकारपणे बर्डी मेन रोड ते धंतोली, गणेशपेठ, अजनी, सक्करदरा या भागात सार्वजनीक रोडने वाहन चालविले व त्याचा व्हिडीयो तयार करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला. सोशल मिडीयावर अश्याप्रकारचे व्हिडीओ वायरल झाल्याने वाहतूक विभाग नागपूर शहर यांनी याची गंभीर दखल घेवून व्हिडीओ तील वाहनांचा व चालकांचा सिओसी कॅमेऱ्यामार्फत शोध घेवून वाहतूक विभाग कार्यालय सिताबर्डी नागपूर शहर येथे एकुण ११ दुचाकी वाहने डिटेन करण्यात आले असून, त्यांचे चालक चिरंजीव अरूण राऊत वय २७ वर्षे रा. कुंभारटोली धंतोली, नागपूर व दहा अल्पवयीन मुले व त्यांचे पालकांकडून एकुण १,१०,००० /- रू. दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच वाहन चालकांविरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे भारतीय दंड संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा सुध्दा नोंदविण्यात आला असून, तपासात वाहन चालक व मालकांवर सुध्दा कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीतेशकुमार पोलीस आयुक्त नागपूर शहर, श्रीमती अश्वती दोरजे सह. पोलीस आयुक्त, श्रीमती चेतना तिडके पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, यांचे मार्गदर्शनात श्री. विनोद चौधरी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सपोनि / तांबे, सफौ / जॉन व स्टाफ वाहतूक परिमंडळ, सिंताबर्डी नागपूर शहर यांनी केली आहे..नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे