क्राइम

ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

Spread the love

नागपुर प्रतिनिधी अमित वानखडे

फिर्यादी नामे – रामानजीयेलु चन्नायेलमंडा गोटीपाटी, वय ५२ वर्ष, रा. येलनंदा वेमारामन ता. बळीकुर्वा जि. बापटला आंध्रप्रदेश ह. मु. साळवा ता. कुही हा अग्रवाल रा. नागपुर शेती ठेक्याने करीत होते. त्या जागेवर फिर्यादी याने आपले ट्रॅक्टर क्र. ए. पी.- ३९ एस. यु.- ०५८० व ट्राली क्र. ए.पी.- ३९ एस. यु-०८२२ अंदाजे किंमती ५,००,००० /- रुपयाचा मुद्देमाल फिर्यादी याने शेतात खाली जागेत ठेवलेला कोणीतरी अज्ञात आरोपीने दिनांक १०/०७/२०२३ रोजी चोरून नेला आहे. अशा फिर्यादीच्या रीपोर्ट वरून पोस्टे कुही येथे अप क्र. ३०२ / २३ कलम ३७९, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता..

सदर गुन्ह्याचे समांतर तपासा दरम्यान घटने वेळी एक पांढऱ्या रंगाची datsun car संशयितरित्या घटनास्थळाचे जवळ संशयितरीत्या फिरलेली असल्याची गुप्त महिती पथकास मिळाली. महिती प्राप्त झालेल्या कारचा शोध घेत असतांना आज दिनांक १३/०७/२०२३ रोजी तश्याच car मध्ये तिन इसम नागपुर उमरेड रोडवर फिरत असल्याचे महिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून बायपास चौक उमरेड येथे पांढऱ्या रंगाची DATSUN कार क्र. MH ०९ EU ६२८७ हिला थांबवून त्यातील तिन इसम नामे- आरोपी नामे- १) कामेश्वर देशमुख २) मंगेश भोंगाडे दोन्ही रा. अंभोरा ह. मु. हिंगणा नागपूर ३) फैजण शेख रा. भंडारा यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेवून त्यांना विचारपूस केली असता दिनांक १०/०७/२०२३ रोजी रात्री दरम्यान त्यांनी याच कारने जावून ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करून गिरन्हाईक पाहून विकण्याचे उद्देशाने पवनी जि. भंडारा येथील नहरापासुन जाणाऱ्या टोळी येथे लपवून ठेवले असल्याचे सांगितले. यावरुन त्याचे ताब्यातून १ ) चोरीस गेलेला ट्रॅक्टर क्र. AP ३९SU ०५८० व ट्रॉली क्र. AP ३९ SU ०८२२ क्रमांकावर पांढरा पेंट लावलेला किंमती अंदाजे ५,००,०००/- रू. २) गुन्हयात वापरलेले वाहन DATSUN कार क्र. MH ०९ EU ६२८७ किंमती अंदाजे ३,००,०००/- असा एकूण ८,००,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करुन जप्त मुद्देमालासह आरोपींना पोलीस ठाणे कूही यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) श्री. विशाल आनंद सर (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात, परी. सहायक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार अनिल म्हस्के सा. (भा.पो.से.), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशीष मोरखंडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, पोलीस नायक बालाजी साखरे, रोहन डाखोरे, पोलीस शिपाई राकेश तालेवार वाहन चालक आशिष बोरकर यांनी पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close