दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024
हिवरखेड:- कलाजीवन बहुउदेशीय संस्था ,ढगा, ता. वरुड ,अमरावती दरवर्षीच समाज विधायक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करीत असते .या वर्षी सुद्धा कलाजीवन बहुउदेशीय संस्था, ढगा अमरावती तथा रोटरी क्लब पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 आयोजित कला ,शिक्षण, समाजसेवा, उद्योग , युवककल्याण ,कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड 2024 हा मानाचा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता .N.P धुमाल ग्रुप चे संचालक *निकुंज पाटील* यांना दादासाहेब फाळके या अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आला
सदर पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते करण्यात आला असून प्रमुख उपस्थितांमध्ये कलाजीवन बहुउदेशीय संस्था अध्यक्ष डॉ युवराज ठाकरे ,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके,रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालंखे , अभिनेता दिग्दर्शक लेखक पियुष भोंडे,किरण इंगळे रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 उप-प्रांतपाल, सूमया पठाण सेलिब्रिटी फॅशन डिझाईन, राज चमरे, ऍक्टर, मॉडेल, पराग भोंडे,डॉ अलका नाईक मुबई, मोनिका इंगळे, उमेश काळमेघ, नितीन ठाकरे, हे होते,
या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 14 जून 2024 रोजी पुण्याई सभागृह पुणे येथे झाला . या दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार करीता संपूर्ण महाराष्ट्रा मधून एकूण दोन हजार लोकांचे प्रस्ताव आले होते, त्यामधून पन्नास लोकांची निवड या पुरस्कारा साठी करण्यात आली होती .