शाशकीय

अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची अतिक्रमण मोहीम संशयाचे भोवऱ्यात

Spread the love

अतिक्रमण मोहिमेत काही तुपाशी तर काही उपाशी

 अंजनगावात विविध चर्चांना उधाण

घोषणा केली परंतु मोहीम राबवलीच नाही

अंजनगावसुर्जी ( मनोहर मुरकुटे)

अंजनगाव व सुर्जी या जुळ्या शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारी ला होणाऱ्या त्रासाबद्दल गेली दोन वर्षांपासून नागरिकांचे तक्रारी वाढत असल्याने नगर पालिकेच्या वतीने प्रसिद्धी करून गेल्या बुधवार (ता.२३) पासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या परंतु प्रभावी मोहीम राबवल्या ना गेल्याने शहरात नानाविध चर्चांना उधाण आले असून , गरीब अतिक्रमित जनतेने सार्वजनिक ठिकाणा वरून स्वतःहून आपली दुकाने उचलली ,स्वतः उचलणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा पाणी बसल्याने पोटमारा होत असून ज्यांनी हिम्मत करून आपली दुकाने कायम ठेवली त्यांच्या व्यवसायाची मात्र चांदी होताना दिसत आहे त्यामुळे पालिकेच्या या अतिक्रमण मोहिमेमध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे काही तुपाशी तर काही उपाशी असल्याचे बोलले जात आहे
************* शहरात असलेल्या राज्यमार्ग तथा केंद्रीय महामार्ग आणि बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व शासकीय जागेवर अतिक्रमण वाढले असून गत आठ वर्षापासून अतिक्रमण मोहीम नसल्याने हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच राहिले त्यामुळे शहर व्याप्त भागात रहदारीला मोठा अडथडा निर्माण होत असून महामार्गाच्या बाजूला लोकांना चालण्यासाठी असलेल्या फूटपाथ वर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन मुख्य मार्गावरून पायी चालावे लागते यामुळे अपघाताचे प्रकार सुद्धा वाढत आहे काही व्यावसायिक यावर लावलेली दुकाणांची खोकी तब्बल लाख दोन लाख रुपये घेवून जागेसह विकत आहेत तर काही तीन ते पाच हजार महिना घेऊन भाड्याने देत आहेत ,जुने बस स्थानक नवीन बस स्थानक पाच पावली, बुधवारा परिसरासह नवीन बस स्थानक ते टाकरखेडा नका या दर्यापूर कडे जाणाऱ्या राज्य मार्गाची तर अवस्था इतकी वाईट झाली की या मार्गालगत असलेल्या पाऊलवाटा अतिक्रमणाने चिकार भरल्या असून पानपट्टी चहा हॉटेल पासून तर थेट विविध कंपनीची दुकाने थाटून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या थेट रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने प्रशासनाने विस्तारित महामार्ग यासाठी बनवला की रहदारी च्या व्यवस्थेसाठी हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे तक्रारी वाढत असल्याने नगर पालिकेच्या वतीने शहरात २३ मे पासून अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक जागेवर असलेल्या अतिक्रमण धारकांना जागा मोकळ्या करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार पालिकेने थातुरमातुर एक दोन ठिकाणी व शहापुरा भागातील एका लेआऊट वरील अर्धवट अतिक्रमण काढून अतिक्रमण धारकास सूचना दिल्या व नवीन बस स्थानक आणि अकोट रोड वरील शहापुरा परिसरातील पालिकेच्या नाक्याच्या इमारती शिल केल्या आणि मोहीम थांबली नवीन बस स्थानक दर्यापूर राज्य मार्गावरील अनेक व्यावसायिकांनी आपले नुकसान होऊ नये या भीतीने आपली दुकाने उचलून नेली तर पालिका कारवाईची भीती न बाळगता काही निडर व्यावसायिकांनी आपली दुकाने कायम ठेवली त्यामुळे दुकानांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या व्यवसायात वृध्दी होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे ज्यांनी दुकाने उचलली हे व्यावसायिक नगर पालिकेत चकरा मारून दररोज कानोसा घेत असून त्यांना अतिक्रमण मोहिमेच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्याने दुकाने उचलल्याचा पछाताप त्यांना होतांना दिसत आहे

मोहीम खंडित असली तरी मोहीम सुरूच राहील
******* अतिक्रमण मोहिमेला सुरुवात झाली परंतु पालिका तपासणी कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या नेमणुका व काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तसेच पोलीस बळ उपलब्ध झाले नाही तसेच न प जवळ मनुष्यबळ कमी असल्याने मोहिमेचे प्रभावी काम होऊ शकले नाही परंतु खंडित झाली असली तरी निरंतर मोहीम सुरूच राहणार ज्या लोकांनी दुकाने काढली नाहीत त्यांनी सुद्धा काढून घ्यावीत असे सहायक अभियंता विठ्ठल घोंगे यांनी सांगितले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close