अचलपुर परतवाडा परीसरात डुक्करांना स्वाईन फ्लु ?
दररोज अज्ञात रोगाने होत आहे डुक्करांचा मृत्यु
अचलपुर प्रतिनिधी -:किशोर बद्रटिये : – अचलपूर परतवाडा शहरासह तालुक्यात गेल्या १५ दिवसापासून अज्ञात रोगाने अनेक डुकरांची अज्ञात रोगाचे मृत्यु होत आहे . प्राथमिक माहितीनुसार स्वाइन फ्लू मुळे या डुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुधन आरोग्य विभागाकडून मिळाली असुन प्रशाशन जागे झाले आहे .
परतवाडा अचलपुर शहरात अनेक नागरिकांचा वराह पालनाचा व्यवसाय आहे गेल्या पंधरा दिवसापासून जुळ्या शहरासह शहराला लागून असलेल्या देवमाळी ,काडंली ,सावळी , ग्रामपंचायत भागात चरण्यासाठी सोडलेल्या वारहाचा अचानक मृत्यू होत आहे . एका मागे एक गेल्या पंधरा दिवसात २५0 च्या वर वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाला आहे . वराह मालकांच्या तक्रारी नंतर यातील काही वराहांचे पशु वैदकीय रुग्णालया तपोस्टमार्टम केले आहे . सदर नमुने राज्य प्रयोगशाळेत तपासणी करता पाठविण्यात आले असून प्राथमीक अंदाजा नुसार स्वाईन फ्ल्यू सारखे रोगामुळे अशा प्रकारे वाहनांचा मृत्यू होत असतो असे पशुधन अधिकाऱ्यामार्फत सांगितल्या गेले असले तरी घेतलेल्या नमुन्यांचा रिपोर्ट येईपर्यंत स्पष्टपणे सांगता येणार नाही नसल्याचे वैद्यकीय अधिकाराने सांगितले आहे .
देवमाळी , कांडली सावळी दातुरा परिसरात अनेक ठिकाणी नवीन नागरी वस्तीत गटारी साचल्या आहेत तसेच परतवडा अचलपुर शहरातुन वाहणाऱ्या बिछन नदी त देखील दोन वाहनांचा मृत्यू झाल्याची माहिती असून शहरालगतच्या ग्रामीण भागात मात्र 200 च्या वर वराहां चा अकस्मात मृत्यू झाला असल्याचे शहरातील पशुपालक कांनी सांगितले आहे .
एकीकडे कोरोना वाढत असतानाच शहर व ग्रामीण परिसरात होत असलेल्या वराहां च्या मृत्यूमुळे नागरिकात भीतीची वातावरण निर्माण झाले असून स्वाईन फ्लूची पुष्टी झाल्यास त्याचे सामान्य नागरिकांना लागत होऊ नये याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे .