क्राइम

महिलेची फसवणुक करून लुटमार करणारे आरोपी अवघ्या दोन तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

Spread the love

नागपूर / अमित वानखडे

फिर्यादी नामे- सौ. शालु देवराव महाजन, वय ४५ वर्ष, रा. नेहरू वार्ड रामटेक यांनी तोंडी रिपोर्ट दिली की, फिर्यादी हे लग्नाकरीता जात असता मोटरसायकलवर अज्ञात तिन इसम येवुन फिर्यादीची फसवणुक करून तिच्या पर्स मधील १) सोन्याचे डोरले व काळे मणी मध्ये गुंफलेले मंगळसुत्र २,९४० ग्रॅम किंमती अंदाजे १४,००० /- रू २) ओपो कंपनीचा अॅनरॉइड मोबाइल फोन ज्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम किमती अंदाजे ५,०००/- रू. ३) नगदी १५००/- रू व पॅन कार्ड असा एकुण २०५०० /- रूपयाचा मुद्देमाल मोटरसायकलवरील अज्ञात तीन चोराने चोरून नेले. फिर्यादीच्या अशा तक्रारीवरून पो स्टे रामटेक अप क्र. २६५ / २०२३ कलम ४२०, ३४ भादवि. वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना तपासा दरम्यान घटनास्थळावरील सी. सी. टी. व्ही. कॅमेराचे फुटेज व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर गुन्हयात संशयित आरोपी नामे १) मोहम्मद सादिक रजा अली २) सय्यद जिशान हैदर रिजवी दोन्ही रा. कामठी यांना सदर गुन्हयात ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता सदर गुन्हा केल्याचे कबूली दिली. आरोपी हे गुन्हयात चोरी गेलेल्या मुद्देमालाची काहीही माहिती देत नव्हते व उडवाउडवीचे उत्तरे देवुन तपासात सहकार्य करीत नव्हते. पोलीसांनी अतिशय कला व कौशल्याचा वापर करून गुन्हयातील चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले साहित्य जप्त केले असुन ते पुढीलप्रमाणे:-

जप्त केलेल्या वस्तुचे वर्णन:- १) दोन डोरले ३ मणी सोन्याचे किंमती अंदाजे १४००० /- रु. २) एक मोबाईल किंमती ५०००/- रु. ३) एक मोटारसायकल किंमती अंदाजे ६००००/- रु. असा एकूण किंमती ७९००० /- रुपयाचा जप्त करण्यात आला असुन सदर जप्ती मुद्देमाल तसेच आरोपीसह पुढील तपास कामी पो.स्टे. रामटेक यांचे ताब्यांत देण्यात आले. सदर गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ०२ तासात आरोपीतांचा शोध घेवुन आरोपींतांना अटक केली.

सदरचा गुन्हा हा पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण श्री विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार नाना राऊत, ईकबाल शेख, अमोल कुथे, पोलीस नायक रोहन डाखोरे, मोनु शुक्ला पोलीस शिपाई विपीन डाखोरे याचे पथकाने पार पाडली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close