ऐन पोळ्याच्या दिवशी ला सर्जा (, बैलाचा )राजाचा अपघातात मृत्यू
अंजनगाव सुर्जी / मनोहर मुरकुटे
शेतकऱ्याचा पोशिंदा सर्जा राजा याचा आजचा दिवस हा वर्षातून येणारा मुख्य एक दिवस म्हणजेच संपूर्ण भारतात साजरा होणारा पोळा सण होय ह्या पोळा सणाला सर्जा राजा बैल याची सकाळी आंघोळ करून संध्याकाळी त्याची विधिवत पूजा अर्चा व सजावट , रंगरंगोटी करून त्याला पंचपकवांनांचा घास भरवल्या जातो , तसेच शहरातील मुख्य चौकामध्ये यात्रेच्या ठिकाणी त्याला उभे करून तेथे सुद्धा त्याची सर्व लोक पूजा करून बेलपत्र वाहतात व शेवट हा मानाच्या बैल जोडीने तोरण तोडून पोळा सन साजरा केला जातो, अशा ह्या सर्जा राजाचा आज सकाळी अंजनगाव सुर्जी येथे अपघातात मृत्यू झाला
सविस्तर असे की आज सकाळी बैल मालक अब्दुल गफार यांचा मुलगा हा सकाळी शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बैलाला चराईसाठी मुख्य रस्त्याने घेऊन जात असताना अचानक रस्त्याने विरुद्ध दिशेने येत असलेल्या ऑटो ने बैलाला जबर धडक दिली या धडकेत बैलाचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे ऐनपोळ्याच्या दिवशी सर्जा राजाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ह्या सर्जा राजाचा अंत्यविधी उपस्थित नागरिकांनी खोडगाव रोडवरील स्मशान भूमी मध्ये विधिवत पूजा अर्चा करून दफन विधी करण्यात आला याप्रसंगी दफन विधीला असंख्य लोक हजर होते