नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी प्रभात ढेपे उप सभापती पदी विलास पाटिल सावदे यांची निवड
आजी माजी आमदारांना वर ढेपे गटाची मात

नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभात ढेपे सभापती व विलास पाटिल सावदे उपसभापती यांची निवड
नांदगाव खंडेश्वर /
नांदगाव खंडेश्वर येथे नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढेपे १८ संचालक निवडून आले आज दिनांक १७/०५/२०२३ रोजी सभापती व उपसभापती यांची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ढेपे गट व शिवसेना (उ ब ठा ) पक्ष यांच्या गटाचे सभापती साठी प्रभात ढेपे यांना १३ मते व दिपक सवई यांना ५ मते व उपसभापती विलास पाटील सावदे १३ मते यांना व विजय अजबले यांना ४ मत्ते एक मत अवैध झाले ,
सभापती पदाकरीता हे प्रभात ढेपे निवडून आले तर उपसभापती शिवसेने चे विलास पाटिल सावदे हे विजयी झाले आहेत ,त्यावेळी उपस्थिती अभिजीत ढेपे पाटील बाळासाहेब भागवत, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कौहळे, बाळासाहेब राणे विलास चौपडे ओकार ठाकरे संजय कणसे प्रकाश मारोटकर प्रविण चौधरी श्यामसुंदर राऊत धनंजय मेटकर,प्रमोद ठाकरे संदिप कणसे विजय जैन सुशिल थोरात बाळासाहेब महाजन एकनाथ गावनेर अर्चना कणसे सोनाली लेंडे विवेक वैष्णव हे उपस्थित होते