राजकिय

आता मनसे चा उबाठा सेनेला दे दणका 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                     राज्यातील निवडणुकीच्या तारखेची घोषणा जरी झाली नसेल तरी सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि पक्षाच्या मोर्चेबांधणी साठी कामाला लागले आहेत. मनसे ने देखील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रभर दौरा करताना दिसत आहे. या दौऱ्यादरम्यान मनसेकडून उमेदवारांचीही घोषणा देखील करण्यात आली आहे. आता राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. मनसे राज ठाकरेंच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते मनोज जामसुतकर यांचे खंदे समर्थक अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांचे असंख्य कार्यकर्ते आणि वरळीतील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाला मोठा धक्का

मनसेने वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

वरळी विधानसभेतील अनेक वर्षांपासून सामाजिक काम करणाऱ्या तरुणांनी मनसेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या तरुणांनी आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मनसेत लोकांचे काम प्रामाणिकपणे आणि जोमाने करू शकतात, अशा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी हा पक्ष निवडला. यापूर्वी या लोकांचा कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंध नव्हता, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

दरम्यान राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य केले होते. त्यानंतर राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. मनसेने 2009 मध्ये 230 ते 250 जागा लढवल्या होत्या. आता येत्या निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागा लढवणार आहे. यासाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहे”, असे राज ठाकरे म्हणाले होते.

मनसेच्या 16 संभाव्य उमेदवारांची नावे

1) शिवडी – बाळा नांदगावकर 2) भायखळा – संजय नाईक 3) वरळी – संदीप देशपांडे 4) माहीम – नितीन सरदेसाई 5) चेंबूर – माऊली थोरवे 6) घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल 7) विक्रोळी – विश्वजित ढोलम 8) मुलुंड – सत्यवान दळवी/राजेश चव्हाण 9) भांडुप – शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर 10) कलिना – संदीप हटगी/संजय तुरडे 11) चांदिवली – महेंद्र भानुशाली 12) जोगेश्वरी – शालिनी ठाकरे 13) दिंडोशी – भास्कर परब 14) गोरेगाव – वीरेंद्र जाधव 15) वर्सोवा – संदेश देसाई 16) मागाठणे – नयन कदम

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close