हटके

आपण ट्रॅव्हल्स ने प्रवास करता काय ?  तर हे वाचाच ! 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया नेटवर्क  .

                    रेल्वेत आरक्षण, बुकिंग यासारख्या अटी असल्याने आणि रेल्वेत तात्काळ आरक्षण मिळत नसल्याने लोक ट्रॅव्हल्स ला पसंती देतात. ट्रॅव्हल्स या रात्रीतून धावत असल्याने दिवसभर काम करून प्रवासी आरामात ट्रॅव्हल्स पकडतात. स्लीपर कोच ट्रॅव्हल्स मध्ये रात्रभर झोप होत असल्याने सकाळी फ्रेश मड मध्ये कामाला लागता येते या मानसिकतेमुळे देखील प्रवाही रेल्वेला पर्याय म्हणून ट्रॅव्हल्स निवडतात. पण देऊळगाव राजा जवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातांनातर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आणि आता त्यांनी ट्रॅव्हल्स ची तपासणी सुरू केली आहे. तपासणी दरम्यान अनेक धक्कादायक बाबी उगजड झाल्या आहेत.”

,समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेनंतर सोलापूर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका, बार्शी रोड, मंगळवेढा रोडवरून पुणे-मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसगाड्यांची पडताळणी केली असून यावेळी “आरटीओ” अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या आहेत. तसेच, अधिकाऱ्यांनी यादरम्यान ९४ गाड्यांवर कारवाई करीत तीन लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

तसेच, आरटीओने तपासलेल्या २१४ ट्रॅव्हल्सपैकी ४३ गाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रेच नसल्याचे उघडकीस आले असून गाड्यांमधील काही यंत्रे मुदतबाह्य झाल्याचे समोर आले आहे. तसेच, ९ ट्रॅव्हल्सचे इमर्जन्सी दरवाजे कायमचे लॉक होते. तर अन्य ३३ गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पडताळणीत निष्पन्न झाले.

दरम्यान, दि. ६ जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. तसेच, या अपघातानंतर राज्य सरकारकडून तज्ज्ञांची समितीदेखील नेमण्यात आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close