क्राइम
आपल्या पेक्षा 10 वर्ष लहान तरुणासोबत प्रेम ,लग्नास गळ नकार देताच केले.असे

पुणे / नवप्रहार ब्युरो
लग्न झालेल्या दिपालीला तिचा नवरा दारू पिऊन मारझोड करत असल्याने ती आपल्या माहेरी राहायला आली होती. दरम्यान तिचे नात्यातील तुषार नामक मुलासोबत सुत जुळले. दिपालीने तुषार कडे लग्नाची मागणी केली होती. तिने तुषार ला कॉल करून तु लग्न करणार नसशील.तर मी मरणार असे म्हटले होते. पण तुषार ने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली.
ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दीपाली जाधव असं आत्महत्या करणाऱ्या २९ वर्षीय महिलेचं नाव आहे. ती पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे वसाहत परिसरात वास्तव्याला होती. याप्रकरणी तुषार दादा कांबळे (१९, रा. बावडा, ता. इंदापूर, पुणे) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. खंडोबाचा माळ, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपालीचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहूनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपालीचा काही वर्षांपूर्वी एका वेगळ्या तरुणासोबत विवाह झाला होता. संबंधित तरुणाला दारुचं व्यसन होतं. दारुच्या नशेत तो दीपालीला सतत त्रास द्यायचा. मारझोड करायचा. यामुळे दीपाली नवऱ्यापासून विभक्त झाली होती. ती आपल्या आई वडिलांसोबत माहेरी राहायला आली. मागील पाच सहा महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान तिची ओळख आपल्याच नात्यातील तुषार कांबळे याच्यासोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
यानंतर दीपालीने तुषारकडे लग्नाची मागणी केली. पण तुषार तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. यामुळे तिने तुषारला फोन करून तू लग्न करणार नाही तर मी मरणार, असं सांगितलं. तरीही त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर नैराश्येतून दीपालीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस एस. नामदे पुढील तपास करत आहेत.




