सामाजिक

आमदार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

Spread the love

हिवरखेड /जितेंद्र फुटाणे

महाराष्ट्र राज्य, आशा चॅरिटेबल ट्रस्ट तथा श्री सद्‌गुरु गजानन महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर एक्सपर्ट प्रस्तुत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजयांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाच्या कार्यक्रमासोबतच मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. चंदूयावलकर यांचा नागरी सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले हायस्कूल, हिवरखेड येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. महेंद्र राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. धनंजय तोटे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खा. डॉ. अनिल बोंडे, आ. चंदू यावलकर, व्याख्याते नरेंद्र केवले, कुणाल शापामोहन, अमोल यावले, सरपंचा सविता मालपे, अॅड. लीनाताई धोटे, सौ. आशाताई पाटील, छायाताई शिरभाते, सा. मो. पाटील, माजी सरपंच देवेंद्र गोरडे, पत्रकार अजय पाटील,अन्सार कुरेशी, रवींद्रवासनकर, धनंजय उमप, सतीश धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. चंदू यावलकर यांच्या हस्ते पत्रकार अजय पाटील सौ. आशाताई पाटील यांचा सपत्नीक, तसेच हिवरखेड गावचे लोकमत चे पत्रकार श्री जितेंद्र ना.फुटाणे हे जवळपास तीस वर्षापासून चांगल्याप्रकारे पत्रकारिता करत असल्यामुळे त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी रेवती राऊत, निर्मिती बंड, प्रणिता नागले, आरती बंदे, पूजा बंदे, मयूर गावंडे, राहुल पंडागळे, विशाल वाघ यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीएमएक्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ऋतिक मालपे यांनी, तर संचालन कल्पक जावरकर यांनी केले. आभार प्रदर्शन सागर घाटोळ यांनी केले.

कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी ऋतिक मालपे, अभिजीत सावरकर, ऋषिकेश धरमकर, ऋषिकेश सावरकर, ऋतिक भोजने, ऋतिक गहूकर, रोहित उपासे, शुभम तडस, दर्शन पाचघरे, समीर दारोकार, रोहित पारधे, सारंग द्रवेकर, कृणाल तडस, दीप देवघरे, प्रज्वल भोजने, वेदांत भेले आदींनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला हिवरखेड गावातील पुरुष, महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close