सामाजिक

आई आणि मुलासाठी काळ बनून आला टिप्पर

Spread the love

आई आणि मुलाचा मृत्यू ; मोठा भाऊ आणि वडील बचावले

नागपूर  / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                   नागपूर वरुन नवीन बुलेट घेऊन गावाकडे (सिंदेवाही ) निघालेल्या वाहनाला टिप्पर ने धडक दिल्याने आई आणि मुलगा पुलावरून खाली फेकल्या गेले. त्यात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. कड्यालवार कुटुंबासाठी टिप्पर काळ बनून आला .

          या घटनेबाबत अधिक माहिती अशी की , सिंदेवाही येथील रमाकांत कड्यालवार यांच्या मुलाने नवीन बुलेट घेऊन मागितल्याने रमाकांत यांनी नागपूर ला जाण्याचा बेत आखला. त्यांना डॉक्टरांकडून चेकअप करायचे असल्याने ते आपल्या चारचाकी वाहनातून नागपूर ला पोहचले.येथे त्यांनी बुलेट घेतली. सगळी कामे आटोपण्यास रात्रीचे 8 वाजले. ते त्यावेळी गावाकडे (सिंदेवाही ) जाण्यासाठी निघाले. चारचाकी वाहनात रमाकांत यांचा मोठा मुलगा समीर , वडील रमाकांत आणि अन्य एक इसम होते. तर लहान मुलगा साहिल हा आई ला घेऊन बुलेट ने निघाला होता. बुलेट पुढे आणि कार मागे असा प्रवास सुरु होता.

           नवीन गाडी असून सुद्धा ती दोनदा रस्त्यात बंद पडली .  काही वेळाने ती सुरूही होत होती. पुन्हा नागभीड-तळोधी दरम्यान असलेल्या बोकडोह पुलावर बुलेट बंद पडली. या बंद पडलेल्या बुलेटजवळ समीरने कार उभी केली. समीरचा लहान भाऊ साहिल आणि आई बुलेटजवळच उभे होते. एवढ्यात नागभीडकडून येणाऱ्या भरधाव टिप्परने चारचाकी आणि बुलेटला धडक देऊन पसार झाला. या धडकेने बुलेटजवळ उभे असलेला साहिल आणि आई कल्पना पुलाखाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

तर कारमध्ये बसलेल्या रमाकांत यांच्या पायाला जबर दुखापत झाली. मोठा मुलगा समीर याने तातडीने पोलिसांना ही माहिती दिल्याने पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रमाकांत यांना नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close