सामाजिक

आ. बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा लढवावी – कार्यकर्त्यांची आग्रही मागणी 

Spread the love
कार्यकर्त्यांनी रक्तदान करून घातले साकडे 
धामणगाव रेल्वे 
प्रतिनिधि – राहुल चांभारे
            आ. बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा लढावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. आज अमरावती येथील डॉ. पंजाबराव रुग्णालयात रक्तदान करून भाऊंना साकडे घातले आहे.
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असुन  प्रत्येक मतदारसंघात विविध राजकीय पक्ष आपलाच उमेदवार असावा अशी मागणी धरून आहे. अश्यातच वर्धा लोकसभेत प्रहार कडून पक्षाचे संस्थापक बच्चु कडू यांनी ही निवडणूक लढावी हि मागणी जोर धरत आहेत. युती कडुन विद्यमान खासदार रामदास तडस यांना उमेदवारी घोषित झालेली असून आघाडी कडून अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नाही आहे. आघाडीत उमेदवारी साठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू असून आहे. आघाडीकडून शैलेश अग्रवाल कि अमर काळे, नितेश कराळे कि हर्षवर्धन देशमुख हा संभ्रम सुरू आहे. अश्या परिस्थितीत बच्चु कडू यांची एंट्रीने वर्धा लोकसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. बच्चु कडू यांनी वर्धा लोकसभा स्वतः लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांची हि भुमिका युतीला मारक ठरेल असे मत राजकीय जाणकारांचे आहेत.
बच्चु कडू यांनी वर्धा लोकसभा लढवावी या मागणी करिता जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे, विदर्भ प्रमुख संजय देशमुख, तालुकाध्यक्ष सुरज गंथडे, निलेश जयसिंगपूरे, अमर गायधने, रामेश्वर पवार, संकेत कावळे, सागर मडावी, विलास कडुकार, मंगेशभाऊ डाफ, अक्षय धोपटे, राहुल चांभारे, दिनेश शेळके, मयूर माकोडे, आशिष मानकर, रणजित घावट, भूषण काळे, रुपेश उज्जेणकर, हर्ष आंबटकर, अनिल भागवे, शेखर कांबळे इत्यादींनी रक्तदान केले.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close