हटके

नवऱ्याला बायकोचे कृत्य खटकले आणि त्याचे डोके सटकले  अन……

Spread the love

लखनऊ  / नवप्रहार वृत्तसेवा 

           बहीण भावाचे नाते हे सगळ्या नात्यांपेक्षा पवित्र समजले जाते. भाऊ कसा जरी असला तरी बहीण मात्र भावासाठी नेहमी चांगले चिंतीत असते. भावाचे चांगले चितणाऱ्या बहिणीने भावाला किडनी दिली.पण तिच्या पतीला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्याने तिला सरळ तलाक दिला.  उत्तर प्रदेशातील गोंडा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे.

महिलेचा पती सौदी अरेबियात काम करतो. त्याची पत्नी उत्तर प्रदेशातील बैरियाही गावात राहते. महिलेने आपली एक किडनी दान करून भावाला वाचवण्याचा निर्णय घेतला. तिला याची कल्पना नव्हती की यामुळे पती नाराज होईल. महिलेने किडनी दान करण्याबाबत पतीला मेसेजवर सांगताच तो भडकला आणि तीन तलाक दिला.

धानेपूर इथल्या तरन्नुमचा निकाह २० वर्षांपूर्वी जैतपूर इथं राहणाऱ्या अब्दुल रशीद उर्फ मोहम्मद राशिदसोबत झाला होता. निकाहनंतर दोघांना अपत्ये झाली नाहीत. त्यानंतर राशिदने दुसरा निकाह केला. तरन्नुमनेच त्याला निकाह करायला परवानगी दिली. दुसरा निकाह केल्यानतंर तो नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला.

दरम्यान, तरन्नुमचा भाऊ शाकिरची तब्येत बिघडली. त्याची तपासणी केल्यानंतर दोन्ही किडन्या खराब झाल्याचं समजलं. तेव्हा तरन्नुमने एक किडनी दान करण्याचा विचार केला. तिने भावाला किडनी देऊन तिने वाचवलं पण ही गोष्ट पतीला पटली नाही. त्याने फोनवरूनच तिला तलाक दिला.

महिलेने आता याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील कारवाई केली जात आहे. २०१९ मध्ये ट्रिपल तलाक अवैध घोषित करण्यात आला होता. ट्रिपल तलाकला कायद्याने बंदी आहे. जर एखाद्याने ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close