हटके

अन्  लोकल ने प्रवास करत असलेल्या महिलेने दुसऱ्या लोकल च्या मोटारमॅन च्या दिशेने भिरकावला दगड 

Spread the love

मुंबई /प्रतिनिधी

               सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असे काही व्हिडिओ असतात की ते पाहून व्हिडिओत दिसत असलेल्या कृतीमागे नेमके कारण काय ? याचा विचार पडतो. नेटिझन्स ना विचारात टाकणारा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक महिला  ट्रेनमध्ये उभी राहून  विरुद्ध बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनवर दगड फेकताना दिसून आली. मुख्य म्हणजे हे दगड तिने ट्रेनच्या मोटरमॅनवर फेकून मारला जो थेट काचेवर जाऊन आदळला. चला यात पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय प्रकरण आहे?

सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरलहोत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करत आहे, तिच्या हातात एक दगड आहे. महिला ट्रेनच्या दरवाजात उभी असून ती हा दगड कुणाला तरी फेकण्याच्या तयारीत असते. तेवढ्यात, विरुद्ध ट्रॅकवर एक लोकल ट्रेन येते, ज्यानंतर ती महिला मोटरमॅनवर निशाणा साधत ट्रेनच्या विंडशील्डवर दगड फेकते. ती तिथेच थांबत नाही तर ट्रेन जात असताना ती मोटरमॅनकडे हात दाखवत काहीतरी बोलत असते, तिच्या चेहऱ्यावर राग असतो पण हा राग कुणासाठी आणि कशासाठी आहे ते समजत नाही. महिलेने ही कृती का केली याचे मूळ कारण कुणालाही ठाऊक नाही. महिलेचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मात्र आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. काही यूजर्स महिलेच्या या कृतीवर संताप व्यक्त करत आहेत तर काही लोक महिला मानसिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे मानत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हरने ती येईपर्यंत तिची वाट पाहिली नसेल म्हणून ती रागवली आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती माझी रुग्ण आहे, ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे, कृपया तिला परत घेऊन या” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ट्रेनकडून बदला घेत आहे का?”.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close